हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतामध्ये कोरोनाव्हायरसमुळे आतापर्यंत ७०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर २३ हजाराहून अधिक लोकांना या धोकादायक विषाणूची लागण झालेली आहे. दरम्यान, देशभरात चालू असलेल्या या लॉकडाऊनला एक महिना पूर्ण झाला आहे. अशा परिस्थितीत आयआयटी दिल्लीने डेटाच्या आधारे एक अहवाल तयार केला आहे. यानुसार, कोरोनाचे दोन तृतीयांश रुग्ण हे देशभरातील या ७ राज्यात राहतात. तसेच या राज्यांत संसर्गित रुग्णांची संख्याही वेगाने वाढतच आहे,जे संपूर्ण देशाच्या संसर्ग होण्याच्या एकूण वेगापेक्षा खूपच जास्त आहे.
ती राज्ये खालीलप्रमाणे आहेत
या यादीमध्ये गुजरात आघाडीवर आहे. अलिकडच्या काळात येथे सर्वात वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे.यानंतर पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, राजस्थान आणि त्यानंतर झारखंडची पाळी येते. हा डेटा कोणत्या राज्यात कोणत्या रूग्णाकडून हा संसर्ग पसरवत आहे या आधारे तयार करण्यात आला आहे. गुजरात येथे आघाडीवर आहे कारण येथे पसरलेल्या संसर्गाची गती ३.३ एवढी आहे. म्हणजेच येथे एका रूग्णातून सरासरी ३.३ नवीन लोकांना संसर्ग होतो आहे,तर देशात हा पसरण्याचे प्रमाण १.८ इतके आहेत.देशात अशी २८ जिल्हे आहेत जिथे संसर्गाचे प्रमाण देशाच्या तुलनेत जास्त आहे.
केरळ, हरियाणा आणि तामिळनाडूसारख्या राज्यात संक्रमणाचा वेग खूप कमी आहे. अहमदाबाद, सूरत, हैदराबाद आणि चेन्नईसह मोठ्या किंवा उदयोन्मुख हॉटस्पॉट भागात कोरोना विषाणूचा संसर्ग पसरल्यामुळे उद्भवणारी परिस्थिती ‘विशेषत: गंभीर’ असल्याचे केंद्राने शुक्रवारी सांगितले. या शहरांमधील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारने सुरक्षा पथकेही पाठविली आहेत. “अहमदाबाद आणि सूरत (गुजरात), ठाणे (महाराष्ट्र), हैदराबाद (तेलंगणा) आणि चेन्नई (तामिळनाडू) यासारख्या मोठ्या हॉटस्पॉट जिल्ह्यात किंवा उदयोन्मुख हॉटस्पॉट शहरांमध्ये ही परिस्थिती तीव्र आहे,” असे निवेदनात म्हटले आहे.
काटेकोरपणे लॉकडाऊन अनुसरण करा
गृह मंत्रालयाने म्हटले आहे की, देशातील काही जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊन मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याची अनेक प्रकरणे समोर आली आहेत. याचा आरोग्यासाठी गंभीर धोका असून यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याचा धोकादेखील आहे. अशा प्रकारे हे उल्लंघन सामान्य लोकांच्या हिताचे नाही आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.