हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आजकाल अमेरिकेत कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव वाढतच आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कार्यालय व्हाईट हाऊसच्या वैद्यकीय तज्ञांनी अशी भीती व्यक्त केली आहे की कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे १००,०० ते अडीच लाख लोकांचा मृत्यू होऊ शकतो.अमेरिकेत सध्या कोरोनामुळे३ लाख लोक पीडित आहेत आणि ८४०० हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. अमेरिकेतील अशा नाजूक परिस्थितीत एका जोडप्याची कथा सोशल मीडियावर चर्चेत आली आहे, हे ऐकल्यानंतर कोणाच्याही डोळ्यात पाणी येइल.
अमेरिकेच्या फ्लोरिडा येथे राहणारे ७२ वर्षीय स्टुअर्ट आणि ७० वर्षीय एड्रियनचे ५१ वर्षांपूर्वी लग्न झाले होते आणि कोरोना विषाणूमुळे सहा मिनिटांच्या अंतराने या दोघांचाही मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे तीन आठवड्यांपूर्वीच दोघेही आजारी पडण्यास सुरुवात झाली. मार्चच्या मध्यावर पती-पत्नीची तब्येत चांगली होती. यानंतर प्रथम स्टुअर्टला कोरोना विषाणूची लागण झाली आणि नंतर त्यांच्या पत्नीलाही याचा संसर्ग झाला. यापूर्वी स्टुअर्टची प्रकृती खूपच बिकट होती, म्हणूनच त्याला आयसीयूमध्ये ठेवण्यात आले होते, तर पत्नीला घरी आइसोलेट राहण्याचा सल्ला देण्यात आला होता. मात्र , नंतर अॅड्रियनची प्रकृती बिघडल्यानंतर तिलाही रुग्णालयात दाखल करावे लागले.
एकत्र राहण्याची शपथ घेणाऱ्या या जोडप्याच्या मृत्यूची बातमी त्यांच्या मुलाने स्वतः शेअर केली आहे.या जोडप्यांचा मुलगा बडी बेकरनेही ट्विटरवर एक भावनिक व्हिडिओ शेअर केला आहे. …
In loving memory of my mom and dad- please make the tough and right choice and help stop the spreading of this virus. pic.twitter.com/FqVEWjdscq
— Buddy Baker (@ESG_Baker) March 31, 2020
सीएनएनला दिलेल्या मुलाखतीत बेकर म्हणाले, “आपल्यापैकी कोणालाही परिस्थितीचे गांभीर्य खरोखरच कळले नाही.” आता हे माझ्या पालकांबाबत घडले आहे, तेव्हा मला त्याचे गांभीर्य समजले. मी यापूर्वी बर्याच गोष्टी वाचल्या आणि त्या हटवल्या.पण आज माझे आईवडील गेल्यानंतर मला समजले की कोरोना व्हायरस किती गंभीर आहे.
काय आहे वटवाघूळ अन् कोरोनाचं कनेक्शन? ICMR चा हा रिपोर्ट वाचून बसेल धक्का#coronavirusindia #coronavirus #BAT #HelloMaharashtrahttps://t.co/9hFO0qZgo5
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 15, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “HelloNews”
इतर महत्वाच्या बातम्या –
या देशांमध्ये अद्याप एकही कोरोनाग्रस्त नाही, घ्या जाणुन
आता ८ एवजी १२ तासांची होणार कामाची शिफ्ट? कायद्यात होणार सुधारणा
मासे किंवा अन्य सीफूड खात असाल तर सावधान! UN ची चेतावणी
भाड्याच्या घरात राहणाऱ्यांना दिलासा, सीएम ठाकरेंनी घेतला ‘हा’ खास निर्णय
सरकार हॅलिकोप्टरमधून टाकणार लोकांसाठी पैसे? जाणुन घ्या सत्य
ब्रेकिंग बातम्यांसाठी पहा -www.hellomaharashtra.in