हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । भारताचा माजी कर्णधार अनिल कुंबळेने शनिवारी सांगितले की, आम्हाला कोरोनाव्हायरस या साथीला एखाद्या कसोटी सामन्याप्रमाणे घ्यावे लागेल आणि संपूर्ण देशाला त्याविरुद्ध एकत्रितपणे लढावे लागेल आणि जिंकूनही द्यावे लागेल. माजी लेगस्पिनर कुंबळेने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे.
कुंबळेने व्हिडिओमध्ये म्हटले आहे की, “जर आपल्याला या कोरोनोव्हायरस साथीविरोधात लढायचे असेल तर त्यासाठी आपण संपूर्ण देशाला एकत्र केले पाहिजे. हे एका कसोटी सामन्यासारखे आहे. कसोटी क्रिकेट सामने पाच हे दिवसांचे असतात. परंतु ते बराच काळ चालतात.”
तो म्हणाला की, “कसोटी क्रिकेटमध्ये दोन डाव असतात, परंतु यामध्ये आणखीही काही असू शकतात. त्यामुळे पहिल्या डावात आपण बरीच आघाडी घेतलीये हे पाहून आनंदी होऊ नका कारण दुसरा डाव कदाचित आपल्यासाठी कठीण असू शकतो.”
Thank you @sumalathaA. Salute all #CoronaWarriors. They are the true heroes. #StayHomeStaySafe pic.twitter.com/DDFr99tz6o
— Anil Kumble (@anilkumble1074) May 9, 2020
माजी कर्णधार पुढे म्हणाला, “आपल्याला ही लढाई जिंकायची आहे. फक्त पहिल्या डावाच्या आघाडीच्या जोरावरच ही जिंकता येणार नाही. आपल्याला हा सामना एकत्रित येऊन जिंकण्याची गरज आहे.”
कोरोनाव्हायरसमुळे आतापर्यंत भारतात १९०० लोकांचा मृत्यू झाला आहे. देशातील लॉकडाउन हे २४ मार्चपासूनच लागू आहे आणि ते पुढे १७ मे पर्यंत सुरूच राहतील.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.