हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । भारतीय कर्णधार विराट कोहली हा क्रिकेटमधील सर्व प्रकारच्या फॉरमॅट मध्ये सध्याच्या काळातील सर्वोत्कृष्ट खेळाडू आहे. तसेच आता कर्णधार म्हणूनही त्याचा आलेख उंचावतो आहे. मात्र जेव्हा कधी डीआरएस घ्यायचा विचार समोर येतो तेव्हा त्याचे नशीब अनेकदा त्याच्याशी विश्वासघात करते. क्रिकेटच्या सामन्यादरम्यान कोहली अनेकदा विचार न करता किंवा घाईघाईने डीआरएस घेताना दिसून येतो. हेच कारण आहे की, डीआरएस घेण्यावरून त्याच्यावर बर्याच वेळा टीका केली जाते.
कोहलीच्या या उणीवेचा फायदा उचलत भारतीय अष्टपैलू रवींद्र जडेजाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये कोहली डीआरएस घेताना दिसत आहेत. जडेजाने यावेळी कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “देखो भाई मैंने नहीं बोला रिव्यू लेने को।”
View this post on Instagram
Dekho bhai meine nai bola hai review lene [email protected] #DRS #skipper
जडेजाच्या या फोटोवर कोहलीने वेळ न घालता एक अतिशय मजेदार रिप्लाय दिला. कोहलीने रिप्लाय मध्ये लिहिले की, “तुला तर सगळेच आउट वाटतात. डीआरएस घेतल्यानंतरच तुला सगळे डाउट्स येतात.” कोहलीच्या रिप्लायनंतर जडेजाची ही पोस्ट सोशल मीडियावर बरीच व्हायरल झाली आहे.
कर्णधार विराट कोहलीचा डीआरएस घेण्याचा रेकॉर्ड खूपच खराब आहे. याचा अंदाज घेता येतो की नोव्हेंबर २०१७ ते ऑक्टोबर २०१९ दरम्यान कोहलीला कर्णधार म्हणून सलग ९ वेळा डीआरएसमध्ये अपयशाला सामोरे जावे लागले. कोहली हा अशा काही मोजक्या खेळाडूंपैकी एक आहे ज्यांचा डीआरएस घेतानाचा रेकॉर्ड फारच खराब आहे. २८ सप्टेंबर २०१७ पासून, कोहलीची कसोटी क्रिकेटमध्ये डीआरएस घेण्याच्या यशाची टक्केवारी ही केवळ ८.३ इतकीच आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.