मुंबई : हॅलो महाराष्ट्र – भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजेच बीसीसीआय उर्वरित आयपीएल युएईमध्ये घेण्याच्या तयारीत आहे. हि स्पर्धा १९ सप्टेंबर रोजी सुरु करण्यात येणार आहे तर 10 ऑक्टोबर रोजी फायनल मॅच होणार आहे. या उर्वरित सामन्यांत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियातील खेळाडू सहभागी होण्याची शक्यता फार कमी आहे. या अगोदर इंग्लंड क्रिकेट टीमचे व्यवस्थापकीय संचालक एश्ले जाईल्स यांनी इंग्लंडचा कोणताही खेळाडू उर्वरित आयपीएल स्पर्धेत खेळणार नाही असे स्पष्ट केले होते.
काय म्हणाले होते एश्ले जाईल्स
“आम्ही आमच्या खेळाडूंना आराम देऊ पण आयपीएल खेळण्याची परवानगी देणार नाही. आमचा कार्यक्रम निश्चित आहे. आमचे सर्वोत्तम खेळाडू टी20 वर्ल्ड कप आणि अॅशेस सीरिजसाठी फिट असावेत, अशी बोर्डाची इच्छा आहे.”असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट टीमचे देखील टी 20 वर्ल्ड कपपूर्वी भरगच्च वेळापत्रक तयार आहे. ऑस्ट्रेलियाची टीम वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर जाणार आहे. यामध्ये ते 5 टी20 आणि 3 वन-डे मॅच खेळणार आहे. वेस्ट इंडिजच्या दौऱ्यानंतर ऑस्ट्रेलियाची टीम बांगलादेशच्या दौऱ्यावर जाणार आहे. आयपीएल 2021 मध्ये इंग्लंडचे 12 आणि ऑस्ट्रेलियाचे 18 खेळाडू खेळत होते.
आयपीएलमधील इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू
सनरायझर्स हैदराबाद : डेव्हिड वॉर्नर, जॉनी बेअरस्टो, जेसन रॉय
राजस्थान रॉयल्स : जोस बटलर, जोफ्रा आर्चर, एण्ड्रयू टाय, लियम लिविंगस्टोन
दिल्ली कॅपिटल्स : स्टीव्ह स्मिथ, मार्कस स्टॉईनिस, डॅनियल सॅम्स, टॉम करन, सॅम बिलिंग्स, ख्रिस वोक्स
पंजाब किंग्स : ख्रिस जॉर्डन, डेव्हिड मलान, झाय रिचर्डसन, राइली मेरिडेथ , मोईसेस हेनरिक्स
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु : ग्लेन मॅक्सवेल, एडम झम्पा, डॅनियल ख्रिस्टीयन, केन रिचर्डसन
मुंबई इंडियन्स : ख्रिस लीन, नॅथन कुल्टर नाईल
कोलकाता नाईट रायडर्स : इयन मॉर्गन, पॅट कमिन्स, बेन कटींग
चेन्नई सुपर किंग्स : सॅम करन, मोईन अली, जेसन बेहरनडॉर्फ