हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन । भारतीय कर्णधार विराट कोहलीने आपल्या फलंदाजीने जगभरातील गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले आहे. यामुळेच सर्व गोलंदाजांना त्याला बाद करावयाचे असते आणि अशा प्रकारे दोन्ही खेळाडूंमध्ये बॉल आणि बॅटची मोठी लढाई बघायला मिळते. उदाहरणार्थ, पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरसमोर विराट कोहलीला खेळताना सर्व क्रिकेट चाहत्यांना पाहायचे आहे. त्याचप्रमाणे बांगलादेशचा वेगवान गोलंदाज रुबल हुसेननेही कोहलीशी झालेल्या आपल्या वादाबद्दल सांगितले आहे.
बांगलादेशचा वेगवान गोलंदाज रुबेल हुसेनने म्हटले आहे की,गेल्या १० वर्षांहून अधिक काळ भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली त्याच्यात कलह सुरु आहे जो अंडर-१९ क्रिकेट पासून सुरु झालेला आहे. तर रुबेल आणि कोहली यांच्यात एकदिवसीय विश्वचषक -२०११ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सतत होत असलेल्या बाचाबाची विषयी चर्चा सुरू आहे.
बीडीक्रिकटाइम.कॉमच्या फेजबुक पेजवरील लाईव्ह सेशनमध्ये त्याचे सहकारी तामीम इक्बाल आणि तस्कीन अहमद यांच्याशी बोलताना रुबेल म्हणाला, “मी अंडर-१९ पासून विराटबरोबर खेळतो आहे. तेव्हापासून माझ्यात आणि त्याच्यात भांडण होते आहे.१९ वर्षांखालील क्रिकेटच्या दिवसात तो बरेच स्लेजिंग करायचा. आता मात्र तो जास्त करत नाही. “
रुबेल म्हणाला, “दक्षिण आफ्रिकेत एक सामना चालू होता. ही तिरंगी मालिका होती. तो खूपच स्लेजिंग करत होता. तो आमच्या फलंदाजांना शिवीगाळ करीत होता. आम्हाला माहित आहे की असे घडते.”
तो पुढे म्हणाला, “आमच्या दोघांमध्ये बाचाबाची झाली आणि पंचांना त्यामध्ये मध्यस्थी करावी लागली.”
विशेष म्हणजे विराट कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाने १९ वर्षांखालील विश्वचषक जिंकला. तेव्हापासून कोहलीने मागे वळून पाहिले नाहीये आणि त्याने सातत्याने आपला खेळ सुधारला आहे आणि आज त्याची गणना जगातील अनेक महान फलंदाजांमध्ये केली जात आहे.
२०१९ मध्ये इंग्लंडमध्ये खेळल्या गेलेल्या आयसीसी विश्वचषकातही रुबेल आणि कोहली समोरासमोर आले होते. त्या सामन्यात भारताने बांगलादेशचा २८ धावांनी पराभव केला.रुबेलने कोहलीला २६ धावांच्या वैयक्तिक धावसंख्येला बाद केले. अशाप्रकारे, विराट कोहली आणि रुबेल यांच्यात बॉल आणि बॅट यांच्यासह झालेले भांडण आजपर्यंत कायम आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.