CSK ला मोठा दिलासा ! धोनीचा ‘हा’ सर्वात खास सहकारी UAE मध्ये खेळणार

CSK
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – आयपीएलमध्ये कोरोनाचा शिरकाव झाल्याने यंदाची आयपीएल अर्ध्यावरच स्थगित करण्यात आली होती. यानंतर शनिवारी बीसीसीआयने उर्वरित आयपीएल युएईमध्ये घेण्यात येणार आहे असे जाहीर केले आहे. येत्या सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात आयपीएलचे उर्वरित सामने घेण्यात येणार आहे. यूएईमध्ये होणाऱ्या आयपीएलमध्ये विदेशी खेळाडू पूर्ण वेळ खेळणार का? याची काळजी फ्रँचायझींना लागून राहिली आहे. इंग्लंड बोर्डाने याअगोदरच त्यांचे खेळाडू ही स्पर्धा खेळणार नसल्याचे जाहीर केले आहे.तसेच वेस्ट इंडिजचे खेळाडू देखील कॅरेबियन प्रीमियर लीगमुळे उशीरा दाखल होण्याची शक्यता असून ऑस्ट्रेलियन खेळाडूंचाही सहभाग अनिश्चित मानला जात आहे. या सर्व पार्श्वभूमीवर चेन्नई सुपर किंग्ससाठी एक आनंदाची बातमी आहे.

चेन्नईचा महत्त्वाचा खेळाडू आणि कॅप्टन महेंद्रसिंह धोनीचा विश्वासू सहकारी सुरेश रैना हा उर्वरित आयपीएल सामने खेळणार आहे. रैनाने ट्विट करून याची माहिती दिली आहे. सुरेश रैना हा पहिल्या सिझनपासून चेन्नई सुपरकिंग्सचा खेळाडू आहे. सुरेश रैनाने आयपीएलमध्ये चेन्नईकडून सर्वात जास्त रन काढले आहेत. सुरेश रैनाने मागच्या वर्षीची आयपीएल सुरु होण्याअगोदर अगदी शेवटच्या क्षणी या स्पर्धेतून माघार घेतली होती.

मागच्यावर्षी रैनाच्या अनुपस्थितीचा चेन्नईला मोठा फटका बसला होता. आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच चेन्नईला ‘प्ले ऑफ’ स्पर्धेत प्रवेश करण्यात अपयश आले होते. आता रैनाने आपण युएईमध्ये खेळणार असल्याचे जाहीर केल्यानंतर चेन्नईच्या फॅन्सना मोठा दिलासा मिळाला आहे. रैनाने यंदाच्या आयपीएलमध्ये 6 इनिंगमध्ये 123 रन काढले आहेत. रैनाने या मोसमात चौथ्या क्रमांकावर बॅटींग केली. जो आधी तिसऱ्या नंबरवर बॅटींग करत होता. आता उर्वरित स्पर्धेत इंग्लंडचा मोईन अली उपलब्ध नसल्याने सुरेश रैना पुन्हा एकदा तिसऱ्या नंबरवर खेळताना दिसणार आहे. आयपीएल स्पर्धा स्थगित होण्यापूर्वी चेन्नईने ७ पैकी ५ सामने जिंकून गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी आहे.