Sunday, May 28, 2023

आयपीएल सोडून जाणाऱ्या खेळाडूंवर BCCI ची पहिली प्रतिक्रिया म्हणाले…

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – सध्या देशात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा परिणाम यंदाच्या आयपीएलमध्ये सुद्धा पाहायला मिळत आहे. यंदाच्या आयपीएलमधून आर. अश्विन याच्यासह चार विदेशी खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. खेळाडू आयपीएलमधून माघार घेत असल्याने आयपीएल स्पर्धेच्या वेळापत्रकावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. त्यावर आता BCCI ने आपली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले बीसीसीआय
आयपीएल स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहे. या स्पर्धेतून ज्या खेळाडूंना माघार घेण्याची इच्छा आहे त्यांनी खुशाल घ्या. त्यांच्या निर्णयामध्ये बीसीसीआयकडून कोणतीही आडकाठी करण्यात येणार नाही. कोणत्याही खेळाडूला माघार घेण्याची इच्छा असेल तर तो तसा निर्णय घेऊ शकतो, असे बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने स्पष्ट केले आहे.

आयपीएलमधून कोणी कोणी माघार घेतली
दिल्ली कॅपिटल्सचा बॉलर आर. अश्विन याने कुटुंबातील व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने आयपीएलमधून माघार घेतली आहे. काल झालेल्या सनरायझर्स हैदराबाद विरुद्धच्या सामन्यानंतर त्याने हि घोषणा केली. जर गोष्टी पहिल्यासारख्या झाल्या तर मी पुन्हा आयपीएलमध्ये खेळेल असेदेखील आर. अश्विनने जाहीर केले आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगलोरकडून खेळणाऱ्या अ‍ॅडम झम्पा आणि केन रिचर्डसन या दोन ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतली आहे. याची माहिती आरसीबीने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून दिली आहे.

राजस्थान रॉयल्सचा फास्ट बॉलर एन्ड्रयू टाय यानेदेखील वैयक्तिक कारणामुळे आयपीएलमधून माघार घेतली आहे. एन्ड्रयू टायला या हंगामात एकही सामना खेळायला मिळाला नाही. एन्ड्रयू टायने शेवटा सामना बिग बॅश लिगमध्ये पर्थ स्क्रॉचर्ससाठी सिडनी सिक्सर्सविरुद्ध खेळला होता. तसेच राजस्थान रॉयल्सचा खेळाडू लियाम लिव्हिंगस्टोन यानेदेखील आयपीएलमधून माघार घेतली आहे.