याच दिवशी कसोटी क्रिकेटमध्ये ५० धावांच्या आतच बाद होऊन टीम इंडियाने केला होता विक्रम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगातील सर्वात बलाढ्य संघांना हरवण्याची क्षमता सध्या भारतीय क्रिकेट संघात आहे. आजच्या युगात कोणताही संघ भारताला कमी लेखण्याची चूक करू शकत नाही. हेच कारण आहे की भारतीय संघात आज इतकी क्षमता आहे की तो कोणत्याही प्रतिस्पर्ध्याविरूद्ध मोठं मोठा स्कोअर नोंदवू शकला आहे.

भारताच्या फलंदाजीची क्रमवारी इतकी मजबूत आहे की ते अगदी सहजपणे कोणतेही कठीण लक्ष्यही गाठू शकतात. मात्र, कसोटी क्रिकेटमध्ये, आजच्याच दिवशी 24 जून 1974 रोजी, भारतीय संघ इंग्लंडविरुद्ध अवघ्या 42 धावांवर बाद झाला होता. यामुळे क्रिकेटच्या या प्रकारात सर्वात कमी धावा करण्याचा विक्रम नोंदविला.

इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात भारताला दुसर्‍या डावात 17 षटकांत फक्त 42 धावाच करता आल्या तर यजमानांनी या सामन्यात 285 धावा केल्या. या सामन्यात प्रथम फलंदाजी करणाऱ्या इंग्लंडच्या संघाने 629 धावांची विशाल धावसंख्या उभारली. याला उत्तर म्हणून भारताने पहिल्या डावात 302 धावाच जमविता आल्या आणि फॉलोऑनचा सामना करावा लागला.

त्याचवेळी दुसऱ्या डावात इंग्लंडचे गोलंदाज हे अधिकच जीवघेणे ठरले आणि भारतीय संघाचा 50 धावांच्या आतमध्ये बाद करून सामना संपविला. भारताकडून दुसर्‍या डावात फक्त एकनाथ सोलकरच दुहेरी आकडा पार करू शकला. याशिवाय एकही फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकला नाही. कसोटी क्रिकेटमधील भारतीय संघाचा हा एक सर्वात वाईट पराभव आहे.

या सामन्यात गोलंदाजीत इंग्लंडकडून जेफ अर्नोल्डने 19 धावा देऊन 4 गडी बाद केले. ख्रिस ओल्डने 21 धावा देऊन 5 बळी घेतले. भारताविरुद्धच्या या सामन्यासाठी अवघ्या 11 तासांपूर्वी अर्नोल्ड इंग्लंड संघात दाखल झालेला होता. बॉर्न विलिसच्या जागी अर्नोल्डचा संघात समावेश करण्यात आला होता. पाठीच्या दुखापतीमुळे तो संघाबाहेर झाला होता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.