३७ शतके झळकाविणारा ‘हा’ फलंदाज म्हणाला-‘विराट कोहलीला पाहून स्वतःला लाज वाटली’

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । या फलंदाजाने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत २२ हजाराहून अधिक धावा केल्या आहेत. त्याने त्याच्या फलंदाजीमध्ये ३७ शतके केली आहेत. सध्याच्या युगातील सर्वात स्फोटक सलामीवीरांमध्ये त्याचा समावेश आहे पण तो जेव्हा विराट कोहली फलंदाजी करताना पाहतो तेव्हा त्याला स्वतःची लाज वाटते. बांगलादेशचा कर्णधार तमीम इक्बाल याच्याबद्दल आम्ही बोल्ट आहोत, ज्याने संजय मांजरेकर यांच्याशी झालेल्या एका खास संभाषणात याची कबुली दिली आहे.

ईएसपीएन क्रिकइन्फोच्या पॉडकास्टमध्ये संजय मांजरेकर यांना दिलेल्या मुलाखती दरम्यान तमीम इक्बालने सांगितले की विराट कोहलीचे कठोर परिश्रम पाहिल्यानंतर स्वत: लाच लाज वाटत आहे. तमिम इक्बाल म्हणाला, ‘या भारतीय क्रिकेटरने आपल्या फिटनेसकडे बरेच लक्ष दिले आहे आणि त्याचा बांगलादेश क्रिकेट संघावरही परिणाम झाला आहे. मला असे म्हणायला लाज वाटत नाही कि विराट कोहलीला २-३ वर्षांपूर्वी जेव्हा जिममध्ये कठोर परिश्रम करताना पाहिले तेव्हा मला स्वतःची लाज वाटली होती. माझ्या एवढेच वय असलेला एक मुलगा आपल्या यशासाठी खूप मेहनत घेत होता,आणि मी त्याच्या अर्ध्याइतकीही मेहनत केली नाही.

तमिम इक्बाल म्हणाला की,’ बांगलादेश संघातील मुशफिकुर रहीम हा आपल्या ट्रेनिंग कडे बरेच लक्ष देतो. तमिम म्हणाला की सामन्याआधी आणि विश्रांतीच्या दिवसांतही तो कठोर परिश्रम करतो.

अलीकडेच तमिम इक्बाल आणि विराट कोहली यांनीही एकमेकांशी व्हिडिओ चॅट केला होता आणि त्यावेळी या बांगलादेशी कर्णधाराने विराटला त्याच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग करण्याचे रहस्य विचारले होते. यावर विराट कोहलीने सांगितले की,’ जेव्हा आपण तरुण होतो तेव्हा टीम इंडियाच्या लक्ष्याचा पाठलाग करताना झालेला पराभव तो पाहत असे. विराट कोहलीला वाटायचे की हा सामना आपण जिंकू शकू. विराट कोहली म्हणाला, ‘लक्ष्याचा पाठलाग करताना त्याच्यावर कोणताही दबाव नसतो. उलट गोष्टी त्याच्यासाठी सोप्या होतात कारण त्याला फलंदाजी कशी करावी हे माहित असते.’

जरी अलीकडे बांगलादेश आणि भारत यांच्यात मैदानावर बरीच भांडणे दिसत आहेत, परंतु तरीही मैदानाबाहेर या दोन्ही देशांचे खेळाडू एकमेकांचा खूपच आदर करतात. तमिम इक्बालसह बांगलादेशातील अन्य खेळाडूदेखील विराट कोहली आणि रोहित शर्माकडून बरेच काही शिकत असतात.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.