हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सोशल मीडिया हा एक प्लॅटफॉर्म आहे जिथे एखादे चांगले करणार्यांची खूप प्रशंसा केली जाते, तर वाईट गोष्टी केल्याबद्दल काहींना ट्रोलही केले जाते. जेव्हा एखादी व्यक्ती चांगली कामगिरी करते तेव्हा मोठमोठे स्टार्स सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांचे कौतुक करतात. या मालिकेत आज भारताचा माजी फलंदाज व्हीव्हीएस लक्ष्मणने अनेकदा मुंबईच्या रस्त्यांवरचे खड्डे भरणाऱ्या मुंबईत राहणाऱ्या दादाराव बिल्होर यांचे कौतुक केले आहे.
भारतीय टीमचा माजी फलंदाज असलेल्या व्हीव्हीएस लक्ष्मणने मुंबईत रस्त्यांवरचे खड्डे भरणाऱ्या त्या व्यक्तीचे कौतुक केले आहे. रस्त्यात खड्डा पडल्यामुळे झालेल्या अपघातात या व्यक्तीने आपला मुलगा गमावला होता. 2015 मध्ये, दादाराव बिल्होर यांनी आपला 16 वर्षाचा मुलगा गमावला आहे. रस्त्यात खड्डा पडल्यामुळे दादाराव यांचा मुलगा अपघाताला बळी पडला होता. आपल्या एकुलत्या एका मुलाच्या झालेल्या निधनानंतर दादारावांनी रस्त्यातले खड्डे भरण्यास सुरुवात केली आहे.
Dadarao Bilhore has been filling potholes in Mumbai ever since he lost his 16 yr old son to an accident caused by a pothole. Even as the grief was tearing him apart, armed with broken paver blocks, gravel, stones & shovel,he started filling every pothole he witnessed. No words ???? pic.twitter.com/Ww5raEEV4P
— VVS Laxman (@VVSLaxman281) June 19, 2020
लक्ष्मणने अशा व्यक्तींचे कौतुक करण्याची ही पहिलीच वेळ नाही आहे, अलीकडेच त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एका 99 वर्षीय महिलेचे फोटो शेअर केले होते ज्यात त्याने एक महिला कोरोनाव्हायरसच्या संकटात प्रवासी मजुरांसाठी जेवण पॅक करताना दिसून आली.
हे छायाचित्र शेअर करताना लक्ष्मणने लिहिले की, ’99 वर्षांच्या अम्मा यांना मुंबईतील प्रवासी कामगारांसाठी जेवण तयार करतांना पाहून खूप आनंद झाला आणि हे प्रेरणादायक आहे. दया आणि उदारपणाची अशी कृत्ये आपली प्रेम आणि काळजी यावरील विश्वास वाढवतात आणि आपण एकमेकांना मदत करण्यास सक्षम आहोत याची जाणीव करून देतात. या अद्भुत महिलांना विनम्र अभिवादन. ‘
It’s so heartwarming and inspiring to watch 99 year old Amma pack food for migrant workers in Mumbai. Such acts of kindness and generosity just increase our belief in the love and care that we are all capable of giving each other. Humble pranams to the wonderful lady. pic.twitter.com/UGU1QrLT1e
— VVS Laxman (@VVSLaxman281) June 4, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.