बोलण्याच्या बहाण्याने घरी बोलावून केला या महिला खेळाडूवर केला बलात्कार; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०१९ साली गाजलेली #MeToo ची मोहीम याची माहिती साऱ्यांनाच असेल. या मोहिमे अंतर्गत अनेक महिलांनी आपल्यावर भूतकाळात झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांची जाहीररीत्या वाच्यत्या केल्या. त्यामध्ये बॉलिवूडमधील काही मोठ्या नावांचाही समावेश होता. या #MeToo च्या मोहिमे नंतर आता #SpeakingOut नावाची एक नवी मोहिम ट्विटरवर ट्रेंड होत असून यात विविध महिला आपल्यावरील शोषणाबाबतच्या गोष्टी इथे शेअर करत आहेत. या मोहिमेमध्ये आतापर्यंत अनेक महिलांनी आपल्याला आलेले कटू अनुभव शेअर केले असून विशेषत: त्या महिलांनी WWE, NWA तसेच इतरही रेसलिंग लीग संघटनांच्या पदाधिकाऱ्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केलेले आहेत.

महिला रेसलर लिज सीवेज हिनेदेखील #SpeakingOut या मोहिमेअंतर्गत आपल्यासोबत घडलेल्या गोष्टी ट्विटरवरून शेअर केल्या आहेत. लिज हिने नॅशनल रेसलिंग अलायन्स (NWA) चे उपाध्यक्ष डेव लगाना यांच्यावर बलात्काराचे आरोप केले. त्या आरोपानंतर लगाना यांनी ताबडतोब आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. NWA ने आपल्या ट्विटरवर अधिकृतरीत्या जाहीर केले की उपाध्यक्ष लगाना यांचा राजीनामा तात्काळ मंजूर करण्यात आला आहे.

लिजने ट्विटरवर याबाबत तिच्याबाबतीत घडलेली गोष्ट पोस्ट केली. तिने लिहिले, “मी #SpeakingOut या मोहिमेत सहभागी होत आहे. रेसलिंग जगतात कॅलिफोर्निया सोडल्यावर जे घडले त्याबद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. माझ्या जीवनातील इतकी मोठी गोष्ट सांगण्यास मला उशीर झाला आहे हे मला मान्यच आहे, मात्र आता मी त्यावर बोलण्याचे धाडस करत आहे. लगाना आणि मी जवळपास चार वर्षे मित्र होतो. त्यानंतर त्याने माझे लैंगिक शोषण केले. त्याने दोन वर्षे सातत्याने विनंती केल्यानंतर मी लॉस एंजेल्सला आले. मी त्याच्या पडत्या काळात त्याला साथ दिली आहे, त्यामुळे मी त्याची एक चांगली मैत्रिण झाले. त्यानेही ते मान्य केले. मी कामासाठी लॉस एंजेल्सला गेल्यावर मला पैशाची कमतरता भासल्याने त्याच्यासोबत राहायचे. सुरूवातीला त्याने काहीही वाईट केले नाही.”

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.