हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई येथे राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून सुरू होत आहे. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. “महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे विजेचे कनेक्शन कापण्यात येत आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी दिलेल्या शब्दाला तिलांजली दिली जात आहे. त्यामुळे या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या शब्दाला किंमत उरलेली नाही, असा टोला फडणवीस यांनी लगावला.
भाजपच्यावतीने आज पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचे गँगस्टर दाऊदसोबत संबंध आहेत. मुंबईत दहशतवाद पसरवणाऱ्या व्यक्तींना पाठिशी घालणाऱ्या सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत आहोत. आम्हाला चहा पाण्यात नाही तर चर्चा करण्यात इंटरेस्ट आहे. अनेक वर्षांनंतर 17-18 दिवस चालणारं अधिवेशन आम्हाला मिळणार आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न घेऊन आम्ही समोर जाणार आहोत.
विधान मंडळाच्या आगामी अधिवेशनाच्या पूर्व संध्येला पत्रकार परिषद https://t.co/tklcwgnOX5
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 2, 2022
विरोधकांची मुस्काटदाबी करून लोकशाही पायदळी तुडवली, त्यानुसार आम्हालाही या सगळ्याचा विचार करावा लागेल महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे विजेचे कनेक्शन कापण्यात येत आहेत. त्यामुळे अजित पवार यांनी दिलेल्या शब्दाला तिलांजली दिली जात आहे. त्यामुळे या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या शब्दाला किंमत उरली नसल्याचं स्पष्ट झाले असल्याचे फडणवीस यांनी सांगितले.