Tuesday, October 4, 2022

Buy now

“‘द काश्मीर फाईल्स’च कौतुक वाटत असेल तर त्यातील पैशातून काश्मिरी पंडितांची घरे बांधावीत” ; जयंत पाटील यांचा फडणवीसांना टोला

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | सध्या विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटावरून सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी द काश्मीर फाईल्सचे कौतुक करताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी टोला लगावला. “काश्मीर फाईल्स हा चित्रपट इंटरव्हलनंतर खूप बोरींग आहे. या चित्रपटाचं इतकंच कौतुक असेल तर जे पैसे मिळाले ते पैसे काश्मिरी पंडितांना दान करायला सांगा. या चित्रपटातून आतापर्यंत १५० कोटीपर्यंत कमाई झाली, ती कमाई आता काश्मिरी पंडितांचे घर बांधायला द्यावे,असे मंत्री पाटील यांनी म्हंटले.

आज मुंबईत विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात ‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाचे पडसाद उमटले. यावेळी प्रथम विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला विधानसभेत बोलायला वेळ दिला जात नाही, अशी तक्रार विधानसभा अध्यक्षांना केली. तसेच आम्ही डंके के चोटे पे काश्मीर फाईल्स बघायला गेलो होतो. ज्यांना आक्षेप घ्यायचा त्यांनी सदनाबाहेर जाऊन बोलावे, असे फडणवीस यांनी म्हंटले.

https://www.facebook.com/hellomaharashtra.in/videos/517056103194626

त्यांच्या या सूचनेवर मंत्री जयंत पाटील यांनी फडणवीसांना टोला लगावला. यावेळी पाटील म्हणाले की, काश्मीर फाईल्स हा चित्रपट इंटरव्हलनंतर खूप बोरींग आहे. या चित्रपटाचं इतकंच कौतुक असेल तर जे पैसे मिळाले ते पैसे काश्मिरी पंडितांना दान करायला सांगा. हा चित्रपट १७ कोटींमध्ये बनवला. आतापर्तंय १५० कोटीपर्यंत कमाई झाली, ती कमाई आता काश्मिरी पंडितांचे घर बांधायला द्यावे, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.