मुंबई । राज्यातील सर्वाधिक कोरोना रुग्णांचे मुंबईत निदान होते आहे. तसेच अनेक रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. या रुग्णांच्या मुतदेहांना पीएफआय या संघटनेला देण्याचा निर्णय १८ मे रोजी घेण्यात आला होता. त्यासंदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देशविरोधी कृत्य करणाऱ्या पीएफआय ला काम देणे कितपत योग्य? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याना विचारला आहे. १८ मे रोजी काढण्यात आलेल्या या आदेशात कोरोना मुळे मृत्युमुखी पडलेल्या मुस्लिम लोकांचे शव पीएफआय ला देण्यात यावे असे सांगण्यात आले होते.
पीएफआय विरुद्ध देशविरोधी कारवाई केल्याचा आरोप आहे असे फडणवीस यांनी म्हंटले आहे. केरळ, कर्नाटक, झारखंड आणि उत्तरप्रदेश या राज्यांमध्ये ही संघटना प्रतिबंधित करण्याची कारवाई सुरु आहे आणि इतकेच नाही तर सीएए च्या काळात या संघटनांनी देशभरात दंगे करण्यासाठी या संघटनेने पैसे दिल्याचा आरोप ईडी ने यांच्यावर केला होता. आणि तसे त्यांचे अकॉउंटस देखील प्रसिद्ध करण्यात आले होते. अशी माहिती फडणवीस यांनी दिली .
फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना प्रश्न केला आहे की, अशाप्रकारे देशविरोधी काम करणाऱ्या संघटनांना शवांची विल्हेवाट करण्याचे काम देणे, आणि त्यांनाच देण्याचा आग्रह करणे कितपत योग्य आहे? आणि तुम्हाला ते मान्य आहे का? आणि मान्य नसेल तर ज्यांनी हे केले आहे त्यांच्यावर कारवाई कराल का? असे प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारले आहेत. तसेच यावर तात्काळ कारवाई करून यामागे कोण आहे याची चौकशी करून हे परिपत्रक मागे घ्यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.