Monday, February 6, 2023

नोव्हेंबर 2020 मध्ये तुम्हाला लाइफ सर्टिफिकेट सादर करावे लागणार का? उत्तर जाणून घ्या

- Advertisement -

नवी दिल्ली । EPFO पेंशनधारकांसाठी महत्वाची बातमी आहे. EPFO ने ट्वीट करून ग्राहकांना सतर्क केले आहे की, ज्यांनी डिसेंबर 2019 मध्ये किंवा त्यानंतर लाइफ सर्टिफिकेट सादर केले आहे त्यांनी नोव्हेंबर महिन्यात लाइफ सर्टिफिकेट सादर केले नाही तरीही त्यांना कोणतीही अडचण होणार नाही.

EPFO ने आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, जर तुमची पेन्शन सुरू होऊन एका वर्षापेक्षा कमी कालावधी झालेला असेल तसेच आपण डिसेंबर 2019 किंवा त्यानंतर आपले लाइफ सर्टिफिकेट सादर केले असेल तर अशा लोकांनी नोव्हेंबर 2020 मध्ये लाइफ सर्टिफिकेट सादर केले नाही तरीही त्यांना कोणतीही अडचण होणार नाही.

- Advertisement -

नोव्हेंबरमध्ये ज्यांना त्यांचे लाइफ सर्टिफिकेट सादर करायांचे आहे त्यांना डिजिटल पर्याय देण्यात आले आहेत. EPFO ने सांगितले की, आटा आपण उमंग अ‍ॅप द्वारे हे सबमिट देखील करू शकता किंवा जवळच्या बँक शाखेत जाऊन जमा करू शकता.

देशभरात पसरलेल्या कोरोना या साथीच्या आजाराची दखल घेत लाइफ सर्टिफिकेट सादर करण्यासाठी दिलासा देण्यात आला आहे. या व्यतिरिक्त आपण – https://locator.csccloud.in/ या लिंक वरून जवळपासच्या सीएससीबद्दल शोधू शकता.

लाइफ सर्टिफिकेट म्हणजे लाइफ सर्टिफिकेट हे पेन्शनधारकाच्या अस्तित्वाचा पुरावा आहे. कोरोना युगात, EPFO लोकांना अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी हा सल्ला देत आहे.

कृपया हे लक्षात असू द्या की, ते जमा न केल्यास आपली पेन्शन थांबवली जाऊ शकते. दिलासा देताना केंद्र सरकारने लाइफ सर्टिफिकेट सादर करण्याची तारीख 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढविली आहे.

पेन्शन धारकांच्या सोयीसाठी सरकारने नोव्हेंबर 2014 मध्ये जीवन प्रमाण सुविधा सुरू केली. हे आल्यामुळे पेन्शनधारकांना यापुढे बँकेच्या त्याच शाखेत जाऊन जिथून पेन्शन येते तेथील लाइफ सर्टिफिकेट सादर करण्याची आवश्यकता नाही.

आपल्याला उमंग अ‍ॅपवर लाइफ प्रूफ सर्च करावे लागेल आणि जनरेट लाइफ सर्टिफिकेटवर क्लिक करावे लागेल. यानंतर, पेन्शनर ऑथेंटिकेशन पेज उघडेल. यामध्ये आवश्यक माहिती भरून डिजिटल लाइफ सर्टिफिकेट तयार केले जाऊ शकते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.