तुम्ही राज्य सभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करता हे विसरू नका; राऊतांचा रेल्वेमंत्र्यांना दम

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय रेल्वेने महाराष्ट्राला आवश्यक रेल्वे पुरविल्या नाहीत असा दावा केला होता. या विधानाला रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी ट्विटर द्वारे उत्तर दिले होते. त्यांनी ट्विट द्वारे सोमवारच्या १२५ रेल्वेची आवश्यक माहिती देण्याची मागणी ट्विटर वरून केली होती. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांना ट्विटरवरून चांगलाच दम भरला आहे. आता यादी कसली मागता आहात? आपण राज्यसभेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत आहात हे विसरू नका अशा शब्दांत त्यांनी रेल्वेमंत्री पियुष गोयल यांना दम भरला आहे.

गोयल यांनी जवळपास ६ ट्विट केले आहेत ज्यामध्ये ठरलेल्या १२५ रेल्वेतील प्रवाशांच्या यादीची मागणी केली आहे. ते ठराविक अंतराने ट्विटर वरून यादी मागत होते. मध्यरात्री २ वाजता आलेल्या यादीनुसार केवळ ४६ रेल्वेची यादी मिळाली असून त्यापैकी ५ रेल्वे पश्चिम बंगाल आणि ओडिसा इथे जाणाऱ्या आहेत ज्या Amphan चक्रीवादळामुळे रद्द करण्यात आल्या आहेत. इतर प्रवाशांची यादी कुठे आहे. अशी विचारणा त्यांनी ट्विट द्वारे केली होती. आम्ही १२५ रेल्वे ठरविल्या होती त्यातील केवळ ४१ रेल्वेच्या प्रवाशाची यादी मिळाल्याचे त्यांनी सांगितले होते.

 

यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी १४ मे २०२० रोजी सुटलेल्या नागपूर उधमपूर रेल्वेच्या साठी कोणती यादी घेतली होती असा करारा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तसेच आधी रेल्वे आणि मग माणसे जमा करण्यासाठी तुम्ही काय कष्ट घेतलेत सांगाल काय? असाही प्रश्न त्यांनी केला आहे. पियुष गोयल यांच्या सततच्या ट्विट मुळे राऊत चांगलेच भडकले असल्याचे दिसून येते आहे. दरम्यान १२५ रेल्वेचा तपशील मागत असताना आम्ही रात्रभर रेल्वेच्या उपलब्धतेसाठी काम करत असल्याचे ट्विट गोयल यांनी केले होते.

 

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.