हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । असे बरेच लोक आहेत जे वेगवेगळ्या संस्थांमध्ये काम करतात, त्या दरम्यान वेगवेगळे पीएफ अकाउंट (PF Account) बनविले जातात. ज्यामुळे जुने पीएफ अकाउंट इन ऑपरेटिव्ह होते.EPFO सिस्टम मधील कर्मचारी भविष्य निर्वाह निधीशी (Employees provident fund) संबंधित बहुतेक प्रकरणे जेथे कंपनी सोडण्याची तारीख नसल्यामुळे पैसे काढता किंवा ट्रान्सफर कऱता येत नाही. कंपनी बंद झाल्यानंतरही बर्याच वेळा आपले पीएफ अकाउंट आपोआप बंद केले जाऊ शकते, ज्यामुळे आपले पैसे देखील अडकून राहतात. तसेच, जेव्हा कंपनी बंद असते, तेव्हा आपले अकाउंट सर्टिफाय करण्याचा मार्ग देखील बंद असतो. जेव्हा असे होते तेव्हा पीएफ खात्यातून पैसे काढणे खूप अवघड होते.
या EPF खात्याचे नियम काय आहेत ते जाणून घेऊयात …
जेव्हा EPF खाते बंद असेल – जर आपली जुनी कंपनी बंद केली गेली असेल आणि आपण नवीन कंपनीच्या खात्यात आपले पैसे ट्रान्सफर केले नाहीत किंवा जर खात्यात 36 महिन्यांपासून कोणताही ट्रान्सझॅक्शन नसेल तर नियमांनुसार आपले खाते आपोआप बंद होईल. EPFO अशी खाती निष्क्रिय (इनएक्टिव) प्रकारात ठेवतात. निष्क्रिय असल्यामुळे या खात्यातून पैसे काढणे देखील अवघड होते. यासाठी खाते सक्रिय ठेवण्यासाठी EPFO शी संपर्क साधावा लागेल. मात्र , निष्क्रिय झाल्यानंतरही खात्यात पडून असलेल्या पैशांवर व्याज दिले जाते.
बँकेच्या मदतीने आपण पैसे काढू शकता – जर आपली जुनी कंपनी बंद झाली असेल आणि आपण नवीन कंपनीच्या खात्यात आपले पैसे ट्रान्सफर केले नसेल किंवा 36 महिन्यांपर्यंत या खात्यात ट्रान्सझॅक्शन झालेला नसेल तर 3 वर्षानंतर हे खाते आपोआप बंद होईल. आणि EPF च्या निष्क्रिय खात्यांशी जोडला जाईल. बँकेच्या मदतीने तुम्ही KYC मार्फत यातील पैसे काढू शकता.
कंपनी बंद झाल्यानंतर कंपनीचे प्रमाणपत्र कसे मिळवायचे
EPFO ने आपल्या एका सर्कुलर मध्ये या नियमाशी संबंधित काही मुद्दे जारी केले होते. EPFO च्या मते, निष्क्रिय खात्यांशी संबंधित दावे निकाली काढण्याची काळजी घेणे आवश्यक आहे. हे लक्षात ठेवले पाहिजे की यामुळे फसवणूकीशी संबंधित जोखीम कमी होते आणि क्लेम हे योग्य दावेदारांना दिले जातात. निष्क्रिय पीएफ खात्यांशी संबंधित दावा निकाली काढण्यासाठी (इनएक्टिव पीएफ खाते) कर्मचार्याच्या मालकाने त्या क्लेमला सर्टिफाइड केले पाहिजे. जर कंपनी बंद केली गेली असेल आणि क्लेम सर्टिफाइड करणारे कोणी नसेल तर, अशा कंपनीला बँक KYC च्या कागदपत्रांच्या आधारे सर्टिफाय केले जाऊ शकते.
कोणती कागदपत्रे आवश्यक असतील?
KYC कागदपत्रांमध्ये पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, रेशन कार्ड, ईएसआय ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्सचा समावेश आहे. याशिवाय शासनाने दिलेली आधारसारखी अन्य कोणतीही ओळखपत्रदेखील वापरता येईल. यानंतर सहाय्यक भविष्य निर्वाह निधी आयुक्त किंवा इतर अधिकारी (रकमेनुसार) पैसे काढण्याची किंवा बदलीची मान्यता घेऊ शकतात.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.