हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसच्या संसर्गामुळे जगभरातील देश त्रस्त झालेले आहेत. अनेक सामर्थ्यवान देशांनी कोरोनासमोर गुडघे टेकले आहेत.अशा संकटाच्या काळात भारत अद्यापही कोरोनाशी झुंज देत आहे. हेच कारण आहे की तापाने ग्रस्त असलेला एक बांगलादेशी तरूण कुशीरा नदीतून पोहत पोहत आसामच्या सीमेवर आला.येथे पोहोचल्यावर त्याने करीमपूर जिल्ह्यातील मुबारकपूर गाठले आणि गावकऱ्यांना सांगितले की, त्याला कोरोना झाला आहे आणि यासाठी उपचारास मदत करण्याची विनंती केली.या तरूणाचे बोलणे ऐकून गावकरी चकितच झाले. या संपूर्ण घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या बीएसएफ जवानांनी या तरूणाला ताब्यात घेतले आहे. नंतर बांगलादेशी सैन्याला बोलावून या युवकाला त्यांच्या स्वाधीन केले गेले.
अब्दुल हक असे या युवकाचे नाव आहे.अब्दुल हा बांगलादेशातील सुनमगंज जिल्ह्यातील रहिवासी आहे आणि तेथून करीमगंजमधील मुबारकपूर परिसर अवघ्या चार किलोमीटर अंतरावर आहे. बीएसएफचे प्रवक्ते आणि डीआयजी जेसी नायक यांनी सांगितले की, रविवारी सकाळी साडेसात वाजता हा तरुण भारतीय हद्दीत घुसला होता.गावकऱ्यांनी त्याला पाहिले तेव्हा त्यांनी त्याला रोखले. त्याच्याशी बोलताना तो एक बांगलादेशी नागरिक असल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर ग्रामस्थांनी सैन्याला याबाबत माहिती दिली. नायक यांनी सांगितले की तपासणी दरम्यान त्याने सांगितले की त्याला कोरोना आहे आणि तो उपचारांसाठी भारतात आला आहे. त्यात कोरोना आहे की नाही याचे स्पष्टीकरण सैन्याने दिलेले नाहीये. यानंतर सैन्याने बांगलादेशी सैन्याला माहिती दिली आणि त्या युवकाला त्यांच्या स्वाधीन केले गेले.
डीआयजी नायक म्हणाले, पावसाळ्यात कुशीरा नदीला अनेकदा पूर येतो परंतु यावेळी पाण्याची पातळी खूपच कमी आहे. ज्याला पोहता येते आहे कोणीही ही नदी सहज पार करू शकेल. ज्या ठिकाणी हा तरुण आला त्या ठिकाणी कुंपण बांधलेले नाहीये, असे नायक यांनी सांगितले.म्हणूनच हा तरूण अगदी सहजपणे भारतात दाखल झाला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.