संपूर्ण देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढले आहेत, अशाप्रकारे असतील नवीन दर जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर आता पेट्रोल-डिझेलची मागणी वाढते आहे. त्याच वेळी, क्रूड ऑइलची किंमतही प्रति बॅरल ४० डॉलरपेक्षा जास्त झाली आहे. त्यामुळे आज पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किंमतीत प्रति लिटर ६०-६० पैशांची वाढ करण्यात आली. लॉकडाऊन दरम्यान, गेल्या ८० दिवसात तेल विपणन कंपन्यांनी (ओएमसी) पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल केलेला नव्हता. मात्र मागच्या वेळी १६ मार्च रोजी इंधनाच्या किंमती बदलल्या गेल्या होत्या .

लॉकडाऊन दरम्यान पेट्रोल आणि डिझेलच्या दरातील चढ-उतारांना राज्य सरकार जबाबदार आहेत. खरं तर राज्यांचा महसूल वाढवण्यासाठी व्हॅट किंवा उपकरात वाढ झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ नोंदवली गेली. लॉकडाऊन दरम्यान रोख रकमेच्या संकटाने झटत असलेल्या बहुतेक राज्य सरकारांनी इंधनावर कर लावून त्यांची आवश्यकता पूर्ण केली.

मे महिन्यात केंद्र सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात १० रुपये आणि डिझेलवर १३ रुपये प्रतिलिटर वाढ केली होती. या वाढीनंतरही दोन्ही इंधनांच्या किरकोळ किंमतीत कोणताही बदल झाला नव्हता. वास्तविक, ही उत्पादन शुल्कात झालेली वाढ कच्च्या तेलाच्या कमी किंमतींसह समायोजित केली गेली. देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमधील बदल हे कच्च्या तेलाच्या किंमतींच्या आधारे ठरविले जातात. कारण आपण आपल्या गरजेच्या सुमारे ८० टक्के क्रूड ऑइल आयात करतो.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमती या प्रति बॅरल गेल्या तीन महिन्यांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचली आहे. एप्रिलमध्ये कच्चे तेल हे प्रति बॅरल ३० डॉलरच्या खाली गेले होते. मात्र २०१९ च्या अखेरिस वेळेपेक्षा अजूनही कच्च्या तेलाची किंमत कमी आहे. एप्रिलमध्ये पेट्रोल आणि डिझेलची मागणीही निम्मी झाली होती. प्रत्यक्षात लॉकडाऊनमुळे अनेक कारखाने तसेच कार्यालये बंद पडली होती. त्याच वेळी, लोकानाही घराबाहेर न जाण्याच्या निर्बंधामुळे रस्त्यावर वाहने फिरकत नव्हती.

इंडियन ऑईलच्या म्हणण्यानुसार एप्रिल २०२० मध्ये पेट्रोलियम उत्पादनांची मागणी ही ४६ टक्क्यांनी घटली आहे. एप्रिल २०१९ च्या तुलनेत या काळात पेट्रोलचे ६१ टक्के, डिझेलचे ५६.७ टक्के आणि एटीएफच्या विक्रीत ९१.५ टक्के घट झाली आहे. गेल्या महिन्यात सरकारने लॉकडाऊन शिथिल केल्याने मे महिन्यात एप्रिलच्या तुलनेत पेट्रोलियम उत्पादनांची मागणी सुधारली. मात्र, मे २०१९ च्या तुलनेत पेट्रोल, डिझेल आणि जेट इंधनाची मागणी ३८.९ टक्के कमी होती. तसेच आता देशभरातील मॉल आणि बाजार सुरू झाल्याने इंधनाची मागणी वाढेल अशी आशा व्यक्त होते आहे.

राष्ट्रीय राजधानीपेक्षा गुरुग्राममधील पेट्रोल डिझेलचे दर कमी आहेत. आज दिल्लीत पेट्रोलची किंमत ७१.८६ आणि डिझेलची किंमत ६९.९९ रुपये प्रतिलिटर आहे. त्याचबरोबर, राजधानीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये पेट्रोल ७१.६८ रुपये आणि डिझेल ६३.६५ रुपयांना विकले जात आहे. मुंबईत पेट्रोल ७८.९१ रुपये तर डिझेल ६८.७९ रुपये प्रतिलिटर आहे. याशिवाय चेन्नईमध्ये पेट्रोल ७६.०७ रुपये आणि डिझेल ६८.७४ रुपये प्रति लिटर विकले जात आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.