आपल्या आधारमध्ये कोणता मोबाईल नंबर लिंक आहे हे विसरलात? तर अशा प्रकारे जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । आजच्या काळात प्रत्येकाकडे दोन किंवा जास्त मोबाइल नंबर आहेत. त्यामुळे हे विसरणे अगदी साहजिकच आहे कि, आपला कोणता नंबर हा आधार कार्ड (Aadhaar Card) शी लिंक केला आहे. त्यानंतर अनेकदा लोकांना अडचणींचा सामना करावा लागतो. आजच्या दिवसात आधार कार्ड हे एक महत्त्वपूर्ण डॉक्युमेंट बनले आहे. प्रत्येक सरकारी आणि गैर-सरकारी कामांमध्ये त्याची आवश्यकता असते. जर आपण कधी विसरला असाल की आपल्या आधार कार्डमध्ये नक्की कोणता मोबाइल नंबरवर लिंक केलेला आहे. तर अशा वेळी गोंधळून जाऊ नका. आता आम्ही आपल्याला काही अशा काही प्रश्नांची उत्तरे देणार आहोत ज्यांद्वारे आपण आपले आधार कार्ड नंबर शोधू शकता.

आता हे देखील लक्षात असू द्या की, 31 मार्च 2021 पर्यंत आपले पॅन-आधारही लिंक (PAN-Aadhaar Linking) करणे आवश्यक आहे. आपण हे लिंकिंग 31 मार्च 2021 पर्यंत पूजेनं केले नाही तर इन्कम टॅक्सच्या अंतर्गत आपल्याला 10000 पर्यंतचा दंड देखील केला जाऊ शकतो.

या मार्गाने वापर करा: जर आपण आपल्या आधार कार्डवरील लिंक मोबाइल नंबर विसरलात तर या स्टेप्स फॉलो करून आपण आपला आधार कार्डवरील मोबाइल नंबर जाणून घेऊ शकता.

> यासाठी सर्वात आधी आपल्याला यूआयडीएआ वेबसाइट https://uidai.gov.in/ वर जावे लागेल.

> वेबसाइट उघडल्यानंतर आपण व्हेरीफाईड ईमेल आणि मोबाइल नंबरवर क्लिक करा.

> येथे क्लिक केल्या नंतर आपल्याला काही माहिती विचारली जाईल. आपण ती माहिती भरा.

> त्यानंतर आपला मोबाइल नंबर मागितला जाईल आणि सिक्योरिटी कोड टाकावा लागेल.

> आपल्या आधार कार्डमध्ये आपला कोणता नंबर लिंक आहे हे माहित जाणून घेण्यासाठी आधी आपला आधार नंबर भरा.

> तुमचा नंबर योग्य असेल तर तुमच्या मोबाईलवर OTP नंबर येईल. यानंतर OTP नंबर व्हेरिफाय केला जाईल आणि आपला शोध पूर्ण होईल.

https://t.co/e2aaRBLASN?amp=1

> आपण यूआयडीएआय वेबसाइट वरून https://uidai.gov.in/ आपला आधार कार्ड नंबर देखील डाउनलोड करू शकता.

https://t.co/aBYywJiXfX?amp=1

https://t.co/HgaSzSMDaa?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.