सांगली प्रतिनिधी | प्रथमेश गोंधळे
सांगली शहर पोलीस ठाण्यासमोरच शुक्रवारी दुपारच्या सुमारास रिक्षामध्ये प्रवासी घेण्याच्या कारणावरून दोन रिक्षा चालकांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी झाली. दुपारी भर रस्त्यात पोलिसांसमोर घडलेल्या प्रकारामुळे महापालिका चौकात एकच गोंधळ उडाला होता.
मारहाण सुरू होताच पोलिसांनी तेथे धाव घेत या दोघा रिक्षा चालकांना पोलीस ठाण्यात आणत त्यांची चांगलीच चौकशी केली. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. सार्वजनिक ठिकाणी अशा पद्धतीने हाणामारी करणाऱ्या या दोघांवर सध्या कारवाई करण्याचं काम सध्या सुरू आहे. मात्र पोलीस ठाण्यासमोरच घडलेल्या फ्रीस्टाईल हाणामारीच्या प्रकारामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
सांगली शहर पोलीस ठाण्यासमोर रिक्षा थांबा आहे. या ठिकाणी बाजारपेठेत येणारे नागरिक रिक्षा थांब्यावर येत असतात. शुक्रवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास एक प्रवासी घरी जाण्यासाठी येथील रिक्षा स्टॉप जवळ आला. तो जाण्यासाठी एका रिक्षामध्ये बसला. त्याठिकाणी असणाऱ्या दुसऱ्या रिक्षाचा ड्रायव्हरने येत त्या प्रवाशाला आपल्या रिक्षात बसा माझा नंबर आहे असे सांगितले. यावरून दोन रिक्षाचालकांमध्ये जोरदार वाद सुरु झाला. वादाचे रूपांतर पुन्हा हाणामारी मध्ये झाले. भर दुपारी शहरातील प्रमुख मार्गावर असणाऱ्या वर्दळीच्या चौकामध्ये हा प्रकार सुरु होता. एकमेकांचे कॉलर पकडून एकमेकांना मारहाण करत हे रिक्षा चालक शिवीगाळी करत हा सर्व प्रकार सुरु होता. दुपारची वेळ असल्याने मोठ्या प्रमाणावर नागरिक या रस्त्यावरून येजा करत होते. सर्वांसमोर हा हाणामारीचा प्रकार घडत असल्याने गोंधळच वातावरण निर्माण झालं होत.
दरम्यान या हाणामारीमुळे भारती कॉलेज चौकात वाहतूक काहीकाळ विस्कळीत झाली होती. पोलिसांच्या निदर्शनास हा प्रकार येताच त्यांनी तातडीने धाव घेत दोघाही रिक्षा चालकांना पोलीस ठाण्यात आणत चांगलीच समाज दिली. अश्या वर्दळीच्या ठिकाणी पोलीस ठाण्यासमोरच फ्रीस्टाईल हाणामारी झाल्याने आश्र्चर्य व्यक्त केलं जात आहे. दरम्यान, या दोघाही रिक्षा चालकांवर कारवाई करण्याचं काम सध्या सुरु आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.