हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसात देशातील पेट्रोल डिझेलचे दर सातत्याने वाढत आहेत. आता शत्रुघ्न सिन्हा यांनी यावर एक व्हिडीओ शेअर करत भाजपाला टोला मारला आहे. काँग्रेसच्या काळात भाजपाच्या नेत्यांनी पेट्रोल डिझेल दरवाढीवर केलेले भाष्य या व्हिडिओमध्ये आहे. या व्हिडिओत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, प्रकाश जावडेकर, दिवंगत अरुण जेटली यांचीही विधाने आहेत. तसेच पेट्रोलचे दर वाढले म्हणून भाजपाने केलेल्या आंदोलनाचे देखील छोटे व्हिडीओ एकत्रित करून हा व्हिडीओ संपादित करण्यात आला आहे.
देशातील पेट्रोलचे दर सातत्याने वाढत आहेत. हेच दर कांग्रेस काळात वाढले असता भाजपाने कांग्रेसवर टीका केली होती. बाईक रॅली, मोर्चे आंदोलने केली होती. सातत्याने दर का वाढविले जात आहेत असा प्रश्न विचारत आम्ही हे दर कमी करू अशी आश्वासनेही भाजपाने दिली होती. मात्र आता वाढणाऱ्या दरांवर सारेच चिडीचूप आहेत. यावर शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या ट्विटर अकॉउंटवरून ‘सर्वांचा आदर करून हा थोडे मीठ घातलेला, विनोदी व्हिडीओ शेअर करत आहे.’ असे म्हणत व्हिडीओ शेअर केला आहे.
शत्रुघ्न सिन्हा हे भाजपामधून निवडणूक लढून जिंकले देखील होते. मात्र २०१९ साली त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यांनी भाजपावर टीकादेखील केली होती. मुंबईत आज पेट्रोलचा दर ८७रुपये १९ पैसे तर डिझेलचा दर ७८ रुपये ८३ पैसे प्रतिलिटर आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.