मुलांसाठी काढा ‘हे’ भविष्य सेव्हिंग अकॉउंट, सरकारी योजनांचा देखील मिळणार लाभ 

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । फिनो पेमेंट्स बँक लिमिटेडने मुलांसाठी भविष्य सेव्हिंग अकॉउंट लॉन्च केले आहे. १० ते १८ वर्षाच्या मुलांसाठी हे विशेष खाते सुरु करण्यात आले आहे. अगदी कमी बॅलन्सवर हे खाते उघडता येणार आहे. मुलांच्या गरजा लक्षात घेऊन हे खाते सुरु करण्यात आले असल्याची माहिती बँकेने दिली आहे. बँकेचे सीओओ आशिष अहुजा यांनी भारताची युवा पिढी भारताचे भविष्य असल्यामुळे त्यांना लहान पणापासून बँकिंगची माहिती असणे आवश्यक आहे असे सांगत हे खाते आधारद्वारे उघडता येऊ शकेल अशी माहिती दिली आहे. या खात्याला सरकारी योजनांचा देखील लाभ मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

भविष्य सेव्हिंग अकॉउंटचे बरेच फायदे मिळणार आहेत. खात्यात किमान रक्कम शिल्लक असण्याची अट असणार नाही आहे. खातेधारकांना डेबिट कार्ड दिले जाणार आहे. जे केवळ एटीएम मधून रोख रक्कम काढण्यासाठी वापरता येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मुलांकडे पालकांच्या मोबाईल नंबर व्यतिरिक्त दुसरा नंबर असणे आवश्यक असणार आहे. यासोबतच मुलांचे वय १८ वर्ष झाले की हे खाते नियमित बचत खात्यात परिवर्तित होईल अशी माहितीही देण्यात आली आहे. यासाठी अद्ययावत माहितीसह केवायसी देणे गरजेचे असणार आहे.

भविष्य बचत खात्याचा उपयोग सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी करता येणार आहे. या खात्यात शिष्यवृत्ती आणि थेट लाभ हस्तांतरण अनुदानाच्या रकमेचा समावेश असणार आहे. बँकेने २०२१ अखेरपर्यंत १ लाख भविष्य खाती उघडण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. भारतात २५ कोटी १०-१८ वयोगटाची लोकसंख्या असल्याचे बँकेचे म्हणणे आहे. २०११ च्या जनगणनेनुसार  ७०% लोकसंख्या ग्रामीण भागात असल्याने ग्रामीण भागातील या बँकेला त्याचा लाभ होईल अशीही माहिती त्यांनी दिली. उत्तर प्रदेश, बिहार आणि मध्यप्रदेश मध्ये नुकतीच या खात्याला सुरुवात झाली आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.