हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । दक्षिणी अफगाणिस्तानातल्या हेलमंद प्रांतातील व्यस्त बाजारात सोमवारी झालेल्या कार बॉम्ब स्फोटात आणि मोटारच्या हल्ल्यात मुलांसह 23 जण ठार झाले. प्रांतीय राज्यपाल कार्यालयाने दिलेल्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. संगिन जिल्ह्यात घडलेल्या या घटनेसाठी तालिबान आणि अफगाण सेना हे दोन्ही एकमेकांवर दोषारोप ठेवत आहेत. हा हल्ला तालिबान्यांच्या नियंत्रणाखाली असल्याने आणि पत्रकारांना प्रवेश न मिळाल्यामुळे या हल्ल्याबाबत स्वतंत्र असा तपशील मिळालेला नाही. राज्यपाल मोहम्मद यासीन यांच्या कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात फारशी माहिती देण्यात आलेली नाही आणि या हल्ल्याची जबाबदारी अद्याप कुणीही घेतलेली नाही.
तालिबानचे प्रवक्ते कारी युसुफ अहमदी यांनी या हल्ल्यात बंडखोरांचा सहभाग असल्याचे नाकारले. तालिबान्यांनी असा दावा केला आहे की सैनिकांनी बाजारात मोर्टार उडवले आहेत, तर सैन्याने सांगितले की, बंडखोरांनी नागरिकांना कार बॉम्ब आणि मोर्टारच्या गोळ्यांनी लक्ष्य केले. सोमवारी त्या भागात लष्करी हालचाल नसल्याचेही सैन्याने सांगितले आणि बाजारात झालेल्या कार बॉम्बच्या स्फोटात दोन तालिबानी सैनिकही ठार झाले आहेत. लोकं या बाजारात मेंढ्या व बकऱ्यांची विक्री करीत होते. या हल्ल्यात प्राणीही मरण पावले आहेत. राष्ट्रपती भवनातर्फे जारी करण्यात आलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, राष्ट्रपती अशरफ गनी यांनी या “क्रौर्य आणि अमानुष कृत्याचा” तीव्र शब्दांत निषेध केला आणि सामान्य नागरिकांना लक्ष्य करणे हे इस्लामिक आणि मानवी मूल्यांच्या विरोधात असल्याचेही म्हटले आहे.
रविवारीही 6 लोकांचा मृत्यू
याआधीही रविवारी अफगाणिस्तानातील हेलमंद प्रांतामध्ये रस्त्याच्या कडेला झालेल्या एका बॉम्बस्फोटात महिला आणि दोन मुलांसह सहा जण ठार झालेले आहेत. एका अधिकाऱ्याने ही माहिती दिली. मात्र अद्याप कुणीही हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. हेलमंद प्रांताचे राज्यपाल प्रवक्ते ओमर झ्वाक यांनी सांगितले की, वाशर जिल्ह्यात हा स्फोट झाला. यावेळी, वाहना मधील आणखी एक महिला जखमी झाली. मात्र, त्यांनी महिलेच्या स्थितीबद्दल आणि ती देखील या कुटुंबातील सदस्य आहे की नाही याबद्दल काही सांगितले नाही. झवाकने या हल्ल्यासाठी तालिबानी अतिरेक्यांना दोषी ठरवले आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.