सोने-चांदीच्या किंमतीत वाढ, जाणुन घ्या आजचे भाव

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । कोरोनाव्हायरसचा शेअर बाजारावरही परिणाम होतो आहे. यामुळेच सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये सतत चढ-उतार होत आहेत. आज सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. बुधवारी सोन्याची किंमत दहा ग्रॅम जवळपास १.४० टक्क्यांनी वाढून ४१,९५७ रुपये झाली आहे. त्याचबरोबर चांदीचे दर सुमारे १.३८ टक्क्यांनी वाढून ४१,०८२ रुपये प्रति किलो झाले आहेत.

आज सोन्या चांदीच्या किंमतींमध्ये प्रचंड चढ-उतार झाले आहेत.
दिल्ली, मुंबई, अहमदाबाद ते हैदराबाद पर्यंत सोन्याचा दर जाणून घ्या.

२४ कॅरेट सोन्याच्या किंमतीबद्दल बोलायचे झाले तर दिल्लीत दर दहा ग्रॅम सुमारे ४२,०७० रुपये आहेत. चेन्नईत आज दहा ग्रॅम सोन्याचा दर ४३६३० रुपये च्या आसपास आहे. कोलकाता येथे सोन्याचे दर आज प्रति १० ग्राम पातळीवर ४२,३७० रुपये आहेत. मुंबईत आज सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४०,९७० रुपये आहे. आज बंगळुरुमध्ये सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४२,४२० रुपये आहे. हैदराबादमध्ये सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४३,६३० रुपये आहे.

२ एप्रिल रोजी सोन्याचा दर काय होता ते जाणून घ्या

मंगळवारी ते दिल्लीत प्रति दहा ग्रॅम ४१,७६० रुपये होते. चेन्नईमध्ये सोन्याचा दर दहा ग्रॅमच्या आसपास ४३,३२० रुपये होता. कोलकातामध्ये सोन्याचे दर प्रति १० ग्राम पातळीवर ४२,०६० रुपये होते. मुंबईत सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ४०,६६० रुपये होते. बेंगळुरूमध्ये सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४२,०६० रुपये होती. हैदराबादमध्ये सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ४३,३२० रुपये होते.

शुद्ध सोने म्हणजे काय ?

बुलियन सोने आणि चांदी अधिकृतपणे कमीतकमी ९९.५ टक्के शुद्ध मानले जातात आणि ते इनगॉट्स किंवा बारच्या स्वरूपात असतात.

या बाजारपेठेत केला जातो सोन्या-चांदीचा व्यवसाय

सोने-चांदी अशा मौल्यवान धातू सराफा बाजारातून खरेदी केल्या जातात. सोने खरेदीचे दोन मार्ग आहेत. लोक सहसा सराफा बाजारातून सोन्याची खरेदी करतात. त्याचबरोबर व्यवसायातील लोक वायदा बाजारातून सोन्याची खरेदी करतात. हा एक बाजार आहे जिथे वायदे बाजारात(फ्यूचर मार्केट) सोन्या-चांदीचा व्यापार होतो.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’

हे पण वाचा –

चिंता वाढली! देशातील करोनाग्रस्तांचा आकडा २९०० पार, ६८ जणांचा मृत्यू

अमेरिकेत कोरोनाचा हाहाकार, २४ तासात १४८० जणांचा मृत्यू

‘कोरोना’ आणि ‘व्हायरस’ नावाची भानगड नक्की काय आहे ?

राज्यातील लॉकडाउन काही आठवडे आणखी लांबणार?; राजेश टोपेंनी दिले संकेत

मरकजच्या लोकांना गोळ्या घातल्या पाहिजे, उपचार कसले करता – राज ठाकरे