हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संचारबंदी नंतर सराफ बाजार सुरु झाल्यापासून सोन्या चांदीच्या दरात सातत्याने घसरण होताना दिसून येत आहे. आज देखील बाजारात सोने आणि चांदी दोन्हीच्या दरात घसरण आढळून आली. आजचा एमसीएक्स सोन्याचा दर ४७,२०० रु प्रति १० ग्रॅम असा होता. तर चांदीचा एमसीएक्स दर ४७,१००रु प्रति किलो असा होता.
२२ कॅरेट सोन्यामध्ये १ ग्रॅम सोन्याचा आजचा भाव ४६०० रु होता. तर १० ग्रॅम सोन्याचा भाव ४६०००रु होता. कालच्यापेक्षा आज दरात २६ रुपयांची घसरण दिसून आली. तर २४ कॅरेट सोन्यामध्ये १ ग्रॅम सोन्याचा भाव ४७२०रु तर १० ग्रॅम सोन्याचा भाव ४७२०० असा होता. कालपेक्षा आज या दरात २६ रु प्रति ग्राम तर २६० रु प्रति १० ग्राम घट दिसून आली. १० ग्रॅम चांदीचा भाव ४७१ रु दिसून आला तर १ किलो चांदीचा भाव ४७१००रु होता. चांदीमध्ये कालपेक्षा प्रति १० ग्रॅम मध्ये ६.१ रुपये तर प्रति किलोमध्ये ६१० रु रुपयांची घट दिसून आली.
दिल्लीत आज २४ कॅरेट सोने ४७४६० रु तर २२ कॅरेट सोने ४६२६० रु प्रति १० ग्रॅम होते. बेंगलोर मध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ४८९६० रु तर २२ कॅरेट सोन्याचा दर ४४८६०रु प्रति ग्राम होता. मुंबईत सोन्याचे दर २४ कॅरेट साठी ४७०१० रु तर २२ कॅरेट साठी ४६०१० रु असा होता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.