हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याच्या किंमती घसरल्यामुळे देशांतर्गत बाजारातही किंमती खाली आल्या आहेत. चार दिवसांच्या वाढीनंतर, दिल्ली बुलियन मार्केटमधील सोन्याचे दर शुक्रवारी प्रति दहा ग्रॅम 52500 रुपयांवर घसरले. त्याचबरोबर मागणी कमी झाल्याने चांदीच्या दरात प्रति एक किलो 990 रुपयांनी घसरण झाली. येत्या काही दिवसांत सोन्याच्या किंमतींवरही दबाव वाढू शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कारण टेक्निकल चार्टवर त्याच्या कमकुवतपणाचे संकेत मिळत आहेत. मात्र, जर ते 1935 डॉलर प्रति औंसच्या वर राहिले तर यास गती मिळू शकेल.
सोन्याच्या नवीन किंमती
सलग वाढ झाल्यानंतर आज चौथ्या दिवशी शुक्रवारी दिल्ली सराफा बाजारात सोन्याच्या किंमतीत घट दिसून आली आहे. 99.9 टक्के शुद्धतेच्या प्रति 10 ग्रॅम सोन्याची किंमत 52,643 रुपयांवरुन 52,452 रुपयांवर आली आहे. या काळात प्रति दहा ग्रॅमच्या किमतींमध्ये 191 रुपयांनी घट झाली आहे.
चांदीच्या नवीन किंमती
सोन्याप्रमाणेच चांदीच्या किंमतीही खाली आल्या आहेत. शुक्रवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये एक किलो चांदीची किंमत दहा ग्रॅम 70,431 रुपयांवरुन 69,950 रुपयांवर आली. या काळात चांदीच्या किंमती या 990 रुपयांनी घसरल्या आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”