नवी दिल्ली । भारतीय रुपयाच्या मजबुतीमुळे देशांतर्गत बाजारात सोन्याची खरेदी स्वस्त झाली आहे. मंगळवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याच्या किंमती 137 रुपयांनी खाली आल्या. त्याच वेळी एक किलो चांदीच्या किंमती 475 रुपयांनी वाढल्या आहेत. तज्ज्ञांचे याबाबत असे म्हणणे आहे की, परदेशी शेअर बाजारात झालेली घसरण आणि डॉलरच्या कमकुवतपणामुळे सोन्याचे भाव वाढलेले दिसून येऊ शकतात. मदत पॅकेजची अपेक्षा तसेच अमेरिका आणि चीनमधील तणाव कायम राहिल्यामुळे सोने अजून खालच्या पातळीवर जाण्याची शक्यता आहे. यापूर्वी सोमवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याचे भाव 59 रुपयांनी घसरून 51,034 रुपये प्रति दहा ग्रॅम वर बंद झाले. चांदीचा भावही 62,008 रुपयांवर आला होता.
सोन्याचे नवीन दर
दिल्ली बुलियन मार्केटमध्ये मंगळवारी सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 137 रुपयांची घसरण झाली. राजधानी दिल्लीत 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याची नवीन किंमत आता प्रति 10 ग्रॅम 51,108 रुपये झालेली आहे. पहिल्या व्यापारी सत्रात सोन्याचा भाव 51,245 रुपयांवर बंद झाला. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय बाजारातही सोन्याची किंमत प्रति औंस 1903.6 डॉलर झाली आहे. तसेच डॉलर निर्देशांकात 0.1 टक्के घसरण झाली. चांदी 0.5 टक्क्यांनी घसरून 24.45 डॉलर प्रति औंसवर बंद झाली.
चांदीचे नवीन दर
चांदीबद्दल बोलताना, आज त्याच्यात तेजी दिसून आलेली आहे. मंगळवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये चांदी 475 रुपयांनी महाग झाली. चांदीचे दर हे 62,173 रुपये प्रतिकिलोवरून 62,648 रुपये प्रतिकिलोवर पोहोचले.
आज सोन्या-चांदीचे दर का घसरले?
एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल म्हणाले की, रुपयाची मजबुती आणि शेअर बाजाराच्या खरेदीमुळे सोन्याच्या किंमतींवर परिणाम दिसून आला.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.