हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशभरात सुरु असलेला लॉकडाउनचा चौथा टप्पा ३१ मे रोजी संपत आहे. लॉकडाऊनच्या या टप्प्यात स्थानिक सराफा बाजार बंद आहेत, तरीही सोन्याच्या किंमती विक्रमी पातळीवर पोहोचल्या आहेत. सध्याच्या संकटाच्या काळात धोका टाळण्यासाठी गुंतवणूकदार हे सोन्याच्या गुंतवणूकीवर अधिक अवलंबून आहेत. यामुळेच सोन्याच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. १५ मे रोजी १० ग्रॅम सोन्याची किंमत ४७,०६७ रुपयांच्या विक्रमी पातळीवर गेली होती. मात्र, या चौथ्या लॉकडाऊन दरम्यान सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत.
https://hellomaharashtra.in/breaking-news-marathi/lockdown-5-0-mha-guidlines-to-states/
शुक्रवारी सोने ६६ रुपयांनी स्वस्त झाले
शुक्रवारी मुंबई बुलियन मार्केटमधील सोन्याच्या किंमतीत प्रति १० ग्रॅम ६६ रुपयांची घसरण होऊन ४६,९२९ रुपये झाली. डॉलरच्या तुलनेत रुपयाची झालेली वाढ तसेच हाँगकाँग वरून चीन आणि अमेरिकेमधील वाढता तणाव यामुळे शुक्रवारी सोन्याच्या किंमतीत घसरणीचे वातावरण होते.
लॉकडाउन १.०: २५ मार्च ते १४ एप्रिल दरम्यान सुरु झालेल्या पहिल्या लॉकडाऊनविषयी बोलताना यावेळी सोन्याच्या एकूण किंमतीत २,६१० रुपयांची वाढ झाली होती.
लॉकडाऊन २.०: १५ एप्रिल ते ३ मे रोजीच्या दुसर्या लॉकडाऊन दरम्यान सोन्याच्या किंमतीत प्रति दहा ग्रॅम १२१ रुपयांची वाढ झाली.
लॉकडाउन ३.०: ४ मे ते १७ मे रोजीच्या तिसर्या टप्प्यातील लॉकडाऊनमध्ये सोन्याच्या किंमतीत प्रति दहा ग्रॅम १,१४४ रुपयांनी वाढ झाली. दरम्यान, यावेळी पहिल्यांदाच सोन्याची किंमत ४७,००० रुपयांच्या पुढे गेली होती.
लॉकडाऊन ४.०: चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊन दरम्यान सोन्याच्या किंमती सातत्याने घसरल्या. मात्र , त्यादरम्यान, तीन दिवस असे होते की जेव्हा सोन्याची किंमत देखील प्रति १० ग्रॅम ४७,००० रुपयांच्या पुढे गेली. १८ मे रोजी सोन्याचे भाव ४७,८६१ रुपये होते, २० मे रोजी ते ४७,२६० रुपये होते आणि २२ मे रोजी ते ४७,१०० रुपये होते. तिसर्या लॉकडाऊनच्या तुलनेत सोन्याचे भाव ९३२ रुपयांनी स्वस्त झाले.
सोन्याचे भाव का वाढत आहेत
कोरोना विषाणूमुळे जगभरात आर्थिक मंदीचे वातावरण आहे. हेच कारण आहे की सर्व केंद्रीय बँका सतत धोरणात्मक व्याज दरांमध्ये कपात करीत आहेत जेणेकरुन अर्थव्यवस्था परत रुळावर येऊ शकेल. अशा परिस्थितीत गुंतवणूकीसाठी सर्वात सुरक्षित पर्याय म्हणजे सोने हे आहे. यावेळी शेअर बाजारामध्ये देखील सतत गोंधळाचे वातावरण आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.