हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एचडीएफसी सिक्युरिटीजने सोमवारी दिल्ली सराफा बाजारातील सोन्या-चांदीच्या किंमतींविषयीची माहिती दिली आहे. दिल्ली सराफा बाजारात आज सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 42 रुपयांची घट झाली आहे. त्याचबरोबर आज चांदीची किंमत ही प्रति किलो 1,217 रुपयांची घसरण नोंदली गेली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात हे दोन्ही मौल्यवान धातू तेजीत असल्याचे दिसून येत आहेत.
सोन्याचे नवे दर – सोमवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये सोन्याच्या किंमतीत प्रति 10 ग्रॅम 42 रुपयांची घसरण झाली, त्यानंतर सोन्याची नवीन किंमत 48,964 रुपये झाली आहे. एचडीएफसी सिक्युरिटीजच्या मते, या आधी 10 ग्रॅम सोन्याचे भाव हे 49,006 रुपयांच्या पातळीवर बंद झाले होते.
चांदीचे नवे दर – चांदीबद्दल बोलायचे झाल्यास आज तिच्या किंमतीमध्ये 1,217 रुपये प्रति किलोची मोठी घसरण नोंदली गेली आहे. यानंतर चांदीचा नवा दर हा 49,060 रुपये प्रतिकिलोच्या पातळीवर आला आहे. पहिल्या व्यापार दिवशी चांदीचा दर 50,277 रुपये प्रतिकिलोवर बंद झाला होता.
आंतरराष्ट्रीय बाजाराबद्दल बोलायचे झाले तर या दोन्ही मौल्यवान धातूंच्या किंमती येथे वाढताना दिसतात. आंतरराष्ट्रीय बाजारात आज सोन्याचे दर प्रति औंस 1,776 डॉलर वर होते, तर चांदी18.10 डॉलर प्रति औंस होती. एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल म्हणाले की, अमेरिकेसह जगातील बऱ्याच मोठ्या अर्थव्यवस्थांमध्ये कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांमुळे सोन्याच्या किंमतींना सपोर्ट मिळेल.
सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक करण्याची संधी
आज सॉवरेन गोल्ड बॉन्ड 2020-21 या मालिकेच्या चौथ्या टप्प्यातील सब्सक्रिप्शन देखील उघडले गेले आहे. अशा परिस्थितीत जर तुम्हालाही या सॉवरेन गोल्ड बॉन्डमध्ये गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला 10 जुलैपर्यंत संधी असेल. यावेळी इश्यू प्राइस 4,852 रुपये प्रति ग्रॅम निश्चित केली गेली आहे. तसेच, ऑनलाइन अर्ज करून आणि पैसे देणार्या गुंतवणूकदारांना, प्रत्येक ग्राम सोन्यावर 50 रुपयांची सूटदेखील मिळेल. ऑनलाईन गुंतवणूकदारांची इश्यू प्राइस ही प्रति ग्रॅम 4,802 रुपये असेल.
गोल्ड बॉन्ड यावर बरेच फायदे उपलब्ध आहेत
पारंपारिकपणे सोने खरेदीच्या तुलनेत या सॉवरेन गोल्ड बाँड (एसजीबी)चे अतिरिक्त फायदे देखील आहेत. यामध्ये सोन्याच्या किंमतीत वाढ होण्याशिवाय तुम्हाला अडीच टक्के दराने अतिरिक्त व्याजही मिळते. तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, जागतिक अर्थव्यवस्थेतील सध्याच्या अनिश्चिततेमुळे सोन्याचे दर वाढण्याची आशा आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.