गेल्या 11 दिवसांत सोनं प्रति दहा ग्रॅम 4000 रुपयांनी झाले स्वस्त, जाणून घ्या आज काय परिणाम होईल?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकेच्या कमकुवत अर्थव्यवस्थेच्या कमकुवत झालेल्या बेरोज़गारी दरा (US Weak Economy Datat) मुळे सोन्याच्या किंमती वाढलेल्या आहेत. आंतरराष्ट्रीय सोन्याचे दर पुन्हा प्रति औंस 1940 डॉलरवर पोचले. मात्र, येत्या काही दिवसातच पुन्हा सोन्याच्या किंमती कमी होणार असल्याचा अंदाज तज्ञ व्यक्त करत आहेत. मागील सत्रात सोन्याच्या व चांदीच्या किंमतीत घट झाली होती कारण सुरुवातीच्या व्यापारात डॉलर निर्देशांक बळकट झाल्यामुळे, मात्र बेरोजगारी आणि मॅन्युफॅक्चरिंग इंडेक्स निर्देशांकातील आकडेवारीमुळे आर्थिक रिकव्हरीची आशा हादरली. यामुळे सोने व चांदीच्या दरात कमी खरेदी दिसून आली.

सोन्याच्या दरात आणखी घसरण होईल का?
तज्ज्ञांच्या मते सध्याच्या पातळीपेक्षा सोन्याच्या किंमती आणखी खाली येऊ शकतात. टेक्निकल चार्टवर देखील, सोने आता कमकुवत दिसत आहे. मात्र , आज सोन्याचे दर स्थिर राहू शकतात किंवा त्यामध्ये थोडासा बदल होण्याची शक्यता आहे.

गुरुवारी दिल्ली बुलियन बाजारपेठेतील 99.9 टक्के शुद्धतेसह सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 54,311 रुपयांवरून घसरून 52,819 रुपये प्रति 10 ग्रॅम झाली. या काळात ते प्रति 10 ग्रॅम 1,492 रुपयांनी घसरले.मुंबईमध्ये 99.9 टक्के शुद्धतेसह सोन्याचे दर दहा ग्रॅम 52528 पर्यंत घसरले.

गुरुवारी दिल्लीत एक किलो चांदीची किंमत 69,400 रुपयांवरून घसरून 67,924 रुपये झाली. या काळात किंमतींमध्ये 1,476 रुपयांची घट झाली. मुंबईत चांदीचे दर 64048.00 रुपये प्रतिकिलोवर गेले.

सोने 4000 रुपयांनी स्वस्त झाले
ऑगस्टच्या दुसर्‍या व्यापार आठवड्यात (10 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट) सोन्याच्या किंमती मोठ्या प्रमाणात घसरल्या. 10 ऑगस्टला सोन्याचे स्पॉट किंमत 10 ग्रॅम प्रति 56 ग्रॅम पर्यंत गेले होते, जे 17 ऑगस्टपर्यंत 2641 रुपयांनी घसरून 52874 रुपयांवर गेले.

रशियाने काढलेली कोरोना विषाणूच्या लसीची घोषणा केल्यानंतर आणि अमेरिकन डॉलरमधील मज़बूतीमुळे, सोन्याच्या किंमतीत या आठवड्यात बरीच चढउतार दिसून आली आहेत. सोने या आठवड्यात 20 ऑगस्टपर्यंत 2100 रुपयांनी सोने स्वस्त झाले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.