हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुरुवारी, डॉलरच्या निर्देशांकातील जोरदार मागणी आणि अमेरिकेत अपेक्षेपेक्षा चांगल्या आलेल्या बेरोजगारी भत्त्याची मागणी असलेल्या आकडेवारीमुळे सोन्या-चांदीच्या परकीय बाजारात घसरण झाली. मात्र, शुक्रवारी सकाळी शेअर बाजारात जोरदार घसरण झाल्यानंतर खालच्या पातळीवरुन सोन्या-चांदीमध्ये किंचित वाढ झाली आहे. गुरुवारी, देशी वायदे बाजारात म्हणजेच एमसीएक्स गोल्ड आणि सिल्वर (MCX Gold Silver Free Tips) रुपयामधील कमजोरीमुळे (भारतीय रुपया) स्थिरतेसह बंद झाला. शुक्रवारी सोन्या-चांदीच्या किंमतींमध्ये वाढ झाली. एमसीएक्सच्या सुरुवातीच्या व्यापारात ऑक्टोबर डिलीव्हरीसाठी सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 0.3 टक्क्यांनी वाढून 50,911 झाला. त्याचप्रमाणे चांदीचा वायदा दर 0.23 टक्क्यांनी वाढून, 67,080 प्रति किलो झाला.
सोने खरेदी करणे आज पुन्हा स्वस्त होऊ शकते
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारतीय रुपयाच्या निरंतर वाढीमुळे सोन्याच्या किंमती पुन्हा घसरतील. गुरुवारी, दिल्ली बुलियन मार्केटमध्ये 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 52,529 रुपयांवरुन 51,755 रुपये झाली. या कालावधीत, सोन्याच्या प्रति दहा ग्रॅमच्या किंमती 774 रुपयांनी खाली आल्या, तसेच चांदीच्या किंमतीही प्रति किलो 1908 रुपयांनी खाली आल्या आहेत. गुरुवारी चांदीचा भाव 71,084 रुपयांवरुन 69,176 रुपयांवर आला.
आता पुढे काय?
पृथ्वी फिनमार्ट प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक (कमोडिटी अँड करन्सी) मनोज कुमार जैन यांचे म्हणणे आहे की, अमेरिकन शेअर बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात विक्री झाल्यामुळे डॉलरच्या निर्देशांकात घट होऊ शकते. ते म्हणतात की, डॉलर निर्देशांकातील घसरणीमुळे सोन्या-चांदीला आधार मिळू शकेल.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.