हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अमेरिकन (USD-US Dollar) डॉलरच्या वाढीमुळे सोन्याच्या किंमती आंतरराष्ट्रीय पातळीवर खाली आल्या आहेत. याचाच परिणाम आज देशांतर्गत वायदा बाजारावरही दिसून येतो आहे. बुधवारी देशी वायदे बाजारात सोन्या-चांदीच्या किंमती खाली आल्या. एमसीएक्सवर ऑक्टोबर डिलीव्हरीसाठी सोन्याचा भाव हा 233 रुपयांनी घसरून 51120 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला. मागील सत्रात तो 51353 रुपयांवर बंद झाला आणि आज सकाळी घसरणीसह ती 51165 वर उघडला. डिसेंबरच्या डिलीव्हरीसाठीचा चांदीचा भाव हा 605 रुपयांनी घसरून 67889 रुपये प्रतिकिलोवर बंद झाला. मागील सत्रात तो 68494 रुपयांवर बंद झाला आणि आज सकाळी 68056 रुपयांच्या किंमतीला खुला झाला.
आज देशांतर्गत बाजारात काय घडेल ?
तज्ञांचे असे म्हणणे आहे की, आज सोन्याचे दर घसरतील. तथापि, त्यात मोठी घसरण होण्याची शक्यता नाही. मंगळवारी दिल्ली बुलियन बाजारपेठेतील 99.9 टक्के शुद्धतेच्या सोन्याची किंमत प्रति दहा ग्रॅम 51,867 रुपयांवरून वाढून 51,989 रुपये प्रति दहा ग्रॅम झाली. या काळात प्रति दहा ग्रॅमच्या किंमती 122 रुपयांनी वधारल्या, सोन्याप्रमाणेच चांदीच्या भावातही वाढ दिसून आली. मंगळवारी दिल्ली बुलियन मार्केटमध्ये एक किलोग्रॅम चांदीचा भाव प्रति दहा ग्रॅम 69,325 रुपयांवरून वाढून 69,665 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला.
आता पुढे काय होईल ?
जगातील सर्वात मोठी संशोधन संस्था जेफरीजच्या अहवालात असे सांगितले गेले आहे की, अमेरिकन डॉलरच्या वाढीमुळे सोन्याच्या किंमती खाली आल्या आहेत. त्यांचा असा विश्वास आहे की, जर सध्याच्या पातळीवरून डॉलर मजबूत झाला तर सोन्याच्या किंमती या प्रति औंस 1900 डॉलरच्या खाली येऊ शकतात. अशा स्थितीत सोन्याची जोरदार विक्री होण्याची शक्यता आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”