हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्र सरकारने पब्लिक प्रॉव्हिडन्ट फंड आणि पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकॉउंट सहित सर्व छोट्या सेव्हिंग स्कीम मध्ये केलेल्या गुंतवणुकीवर जुलै आणि सप्टेंबर मध्ये मिळणाऱ्या व्याजावर कोणतेच बदल केलेले नाहीत. याआधी सरकारी बॉंडमध्ये झालेल्या घसरणीमुळे छोट्या बचत योजनांमध्ये केलेल्या गुंतवणुकीच्या व्याजदरात घट होण्याची होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र अशी कोणतीच घट होणार नसल्याचे समोर आले आहे.
सरकारने ५ वर्षाच्या रिकरिंग डिपॉझिटवर ५.८% व्याज मिळणार असल्याचे सांगितले आहे. शिवाय ज्येष्ठ नागरिक सेव्हिंग स्कीमवर ७.४०% व्याज मिळणार आहे. तर दरमहा कमाई स्कीमवर ६.६% व्याज मिळणार असल्याची माहिती देण्यात आली. पीपीएफ वर मागच्या तिमाहीत ७.१% व्याज मिळत होते. जुलै सप्टेंबर मध्येही तितकेच मिळणार आहे. तर राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र वर ६.८% व्याज मिळणार आहे. सुकन्या समृद्धी योजनेत सर्वाधिक ७.६% व्याज मिळणार आहे.
किसान विकास पत्रवर गुंतवणूकदारांना ६.९% व्याज दिले गेले आहे. सर्व छोट्या बचत स्कीममध्ये सुकन्या समृद्धी योजनेत अधिक व्याज मिळणार आहे. देशातील सर्वात मोठी कर्जदाता बँक स्टेट बँक ऑफ इंडिया ५ ते १० वर्षाच्या फिक्स डिपॉझिट साठी ५.४% व्याज देते आहे. केंद्र सरकार २०१६ पासून तिमाही आधारावर सेव्हिंग स्कीमवर मिळणाऱ्या व्याजाचे समिक्षण करते आहे. याआधी व्याज दरात वार्षिक समिक्षण केले जात होते. एप्रिल-जून २०२० च्या तिमाहीत सरकार ने पीपीएफ वर मिळणाऱ्या व्याजात ०.८% घट करून ७.१% केले होते. अर्थात जानेवारी-मार्च मध्ये हे व्याज ७.९% मिळत होते. अनेक नोकरदार या स्कीममध्ये पैसे गुंतवून आयकरापासून सूट मिळविण्यासाठी दावा करतात. सरकारने संचारबंदीमुळे गुंतवणुकीची मुदत ३१ जुलै पर्यंत वाढविली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.