Google आणि Amazon वर डेटा प्रायव्हसी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप, लागला 16.3 कोटी डॉलर्सचा दंड

नवी दिल्ली । फ्रान्सच्या CNIL या डेटा प्रायव्हसी मॉनिटरींग संस्थेने गुगलला 10 कोटी युरो (12.1 कोटी डॉलर्स) आणि Amazon ला 3.5 कोटी युरो (4.2 कोटी डॉलर्स) दंड केला आहे. हे दोन्ही दंड देशाच्या जाहिरात कुकीज नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल लागू करण्यात आले आहेत. नॅशनल कमिशन ऑन इनफॉरमॅटिक्स अँड लिबर्टीने (CNIL) एका निवेदनात म्हटले आहे की, या दोन कंपन्यांच्या फ्रेंच वेबसाइट्सने इंटरनेट ग्राहकांकडून जाहिरातीच्या उद्देशाने ट्रॅकर्स आणि कुकीज वाचण्याची पूर्व परवानगी घेतली नव्हती. या कुकीज आणि ट्रॅकर स्वयंचलितपणे त्या व्यक्तीच्या संगणकात सेव्ह केल्या जात आहेत.

CNIL ने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, Google आणि Amazon ग्राहकांना हे सांगण्यास अपयशी ठरले की, ते या हेतूसाठी या कुकीज वापरतील आणि ग्राहक त्यांना नकार कसा देऊ शकतात. यासह CNIL ने म्हटले आहे की, सप्टेंबर महिन्यात दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या वेबसाईटमध्ये काही बदल केले होते. जे फ्रान्सच्या नियमांनुसार पुरेसे नव्हते.

CNIL कुकीजच्या नफ्यावर आरोप करतो
फ्रेंच संस्था CNIL, Google बाबत असे म्हणते की, कुकीजच्या मदतीने गुगलने जो डेटा गोळा केला आहे त्याद्वारे त्यांनी चुकीच्या पद्धतीने कमाई केलेली आहे. याचा थेट परिणाम सुमारे मिलियन यूजर्सवर होतो आहे. त्याचबरोबर CNIL नेसांगितले की, नियमांचे उल्लंघन केल्यानुसार दंडाची रक्कम अचूक आहे.

https://t.co/Fq1WKHWiRf?amp=1

Google, Amazon ला मिळाली तीन महिन्यांची मुदतवाढ
CNIL ने Google आणि Amazon ला तीन महिने दिले आहेत. ज्यामध्ये या दोन कंपन्यांना त्यांच्या कार्य पद्धती बदलून त्यांना यूजर्सना कुकीजला मनाई करण्यास सांगावे लागेल. जर या दोन्ही कंपन्यानी CNIL ने ठरवलेल्या मुदतीत ठोस पावले उचलली नाहीत. तर त्यांना दररोज 121,095 अमेरिकन डॉलर्सचा दंड आकारला जाईल.

https://t.co/GOZc6fZZot?amp=1

Google ला यापूर्वीच दंड ठोठावण्यात आला आहे
गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये फ्रान्सच्या कॉम्पिटीशन अ‍ॅथॉरिटीने ऑनलाइन जाहिरातींच्या बाजारातील त्यांच्या वर्चस्वाचा गैरवापर केल्याबद्दल गूगलला 16.7 कोटी डॉलर्सचा दंड ठोठावला. प्राधिकरणाने Google वर लादलेला हा पहिला दंड होता.

https://t.co/Gi6xm927EZ?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.