Google India म्हणाले, Google Pay ला आर्थिक व्यवहार सुविधा देण्यासाठी RBI च्या मंजुरीची आवश्यकता नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुगल इंडिया डिजिटल प्रायव्हेट लिमिटेडने दिल्ली उच्च न्यायालयात सांगितले आहे की, गुगल-पे अ‍ॅपला भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) च्या परवानगीची आवश्यकता नाही. गूगल इंडियाने म्हटले आहे की, गूगल-पे पेमेंट सिस्टम ऑपरेटर (पीओएस) नाही. हा थर्ड पार्टी अ‍ॅप्लिकेशन प्रदाता आहे. गुगलने याबाबत म्हटले आहे की, आरबीआय-ऑथराइज्‍ड पीएसओ ही नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) आहे, जे यूपीआय नेटवर्कचे मालक आणि ऑपरेटर आहेत.

NPCI थर्ड पार्टी अ‍ॅपच्या प्रदात्यास करते अधिकृत
गुगल इंडियाने उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे की, NPCI पेमेंट सर्व्हिस प्रदान करणार्‍या बँकांना आणि गुगल पेसारख्या थर्ड-पार्टी अ‍ॅप्लिकेशन (टीपीए) कंपन्यांना त्यांच्या नेटवर्कवर व्यवहार करण्यास अधिकृत करते. खरं तर, एका पीआयएलमध्ये असा आरोप केला गेला होता की, गुगलचे मोबाईल पेमेंट अ‍ॅप गुगल-पे किंवा जी-पे हे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून आवश्यक परवानगीशिवाय आपली आर्थिक व्यवहाराची सुविधा प्रदान करत आहे.

‘आर्थिक व्यवहाराची सुविधा देण्यास मान्यता नाही’
दिल्ली हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश डी.एन. पटेल आणि न्यायमूर्ती प्रितीक जालान यांचे खंडपीठ पुढील 31 ऑगस्ट रोजी या प्रकरणी सुनावणी घेणार आहे. वास्तविक, याचिकाकर्त्याने गुगलच्या प्रतिज्ञापत्रास उत्तर देण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली होती. याचिकाकर्ते अर्थशास्त्रज्ञ अभिजीत मिश्रा यांनी असा दावा केला आहे की जी-पे नियमांचे उल्लंघन करीत पेमेंट सिस्टम प्रदाता म्हणून काम करत आहे. भारताच्या मध्यवर्ती बँकेकडून आर्थिक व्यवहाराची सुविधा देण्याची आवश्यक परवानगी नाही

‘NPCI लिस्ट मध्ये गुगल-पेचा समावेश नाही’
मिश्रा यांनी युक्तिवाद केला की 20 मार्च 2019 रोजी जाहीर झालेल्या पेमेंट सिस्टम प्रदात्यांच्या NPCI लिस्ट मध्ये जी-पेचे नाव नाही आहे. गुगलच्या वतीने अ‍ॅडव्होकेट हिमांशु विज यांनी असा युक्तिवाद केला की ते NPCI च्या नियमांनुसारच काम करतात. त्यांची मार्गदर्शक तत्त्वे आणि संबंधित कायद्यांचे ते पालन करतात. आरबीआयने असेही म्हटले आहे की गुगल-पे हा थर्ड-पार्टी अ‍ॅप्लिकेशन प्रदाता आहे. तो कोणतीही पेमेंट सिस्टम चालवत नाही. म्हणूनच ते ऑपरेटिंग पेमेंट अँड सेटलमेंट सिस्टम अ‍ॅक्ट, 2007 चे उल्लंघन करत नाही.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

Leave a Comment