मधांत साखर मिसळणार्‍या मोठ्या ब्रँडसवर आता सरकार कडून केली जाणार कडक कारवाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (FSSAI) यांना देशात मधामध्ये भेसळ होत असल्याच्या बातम्या सातत्याने समोर आल्यानंतर योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. CCPA च्या निर्देशानंतर देशातील ब्रँडेड कंपन्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. ग्राहक व्यवहार मंत्रालयाने एक अधिकृत निवेदन जारी करून मधात भेसळ केल्याच्या बातमीवर चिंता व्यक्त केली आहे. ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या निवेदनानंतर CCPA ने हे आदेश दिले आहेत.

बाजारात विकले जात आहे भेसळयुक्त मध
गेल्या आठवड्यात, पर्यावरणविषयक कामांवर नजर ठेवणाऱ्या सेंटर फॉर सायन्स अँड एनवायरनमेंट (सीएसई) ने दावा केला आहे की, भारतात विकल्या जाणाऱ्या अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या मधात साखर आढळली. तथापि कंपन्यांनी हे दावे फेटाळले. मंत्रालयाने म्हटले आहे की, मार्केटमध्ये विकल्या जाणाऱ्या बहुतेक ब्रँडेड मधात साखर मिसळल्याची बातमी विभागाला मिळाली आहे. ही एक गंभीर समस्या आहे आणि कोविड 19 च्या साथीच्या आजारात लोकांच्या आरोग्याशी खेळू शकतात. यामुळे कोविड 19 चा धोका वाढणार आहे.

https://t.co/N2a1zC7bbD?amp=1

CCPA ने FSSAI ला या प्रकरणात योग्य ती कारवाई करण्यास सांगितले आहे. सीएसईने 13 टॉप ब्रँड तसेच बर्‍याच लहान ब्रँडच्या प्रोसेस्ड आणि कच्च्या मधातील शुद्धता तपासली. सीएसईमध्ये 77 टक्के नमुने भेसळयुक्त असल्याचे आढळले. चाचणी केलेल्या 22 नमुन्यांपैकी केवळ पाचच नमुने सर्व प्रकारच्या चाचण्यांतून बचावले. तथापि, कंपन्यांनी हे दावे फेटाळले. कंपन्यांनी दावा केला आहे की, आम्ही भारतात नैसर्गिकरित्या मध संकलित करतो आणि विकतो.

https://t.co/UXU4EnMMnb?amp=1

हा घोटाळा कसा पकडला गेला
गेल्या वर्षी, अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने आयातदार आणि राज्य अन्न आयुक्तांना सांगितले होते की, गोल्डन सिरप, इनवर्ट शुगर सिरप आणि राइस सिरपचा वापर मधात भेसळ करण्यासाठी केला जात आहे. सीएसईच्या फूड सेफ्टी अँड टॉक्सिन टीमचे प्रोग्राम डायरेक्टर अमित खुराना म्हणाले की, आम्हाला जे सापडले ते धक्कादायक आहे. यावरून हे दिसून येते की भेसळ व्यापार किती विकसित झाला आहे जो भारतातील चाचण्यांमधून सहजपणे वाचले जातात. आम्हाला आढळले की शुगर सिरप अशा प्रकारे तयार केले गेले आहे की त्यातील घटक सहजपणे कोणीही ओळखू शकणार नाहीत.

https://t.co/f0xIGvqhOJ?amp=1

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.