व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

सरकार कधीही करू शकते तिसऱ्या मदत पॅकेज बाबतची घोषणा, यावेळी आपल्यासाठी काय विशेष असेल ‘हे’ जाणून घ्या

नवी दिल्ली । केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार कोणत्याही वेळी तिसर्‍या मदत पॅकेजची घोषणा करू शकते. आर्थिक व्यवहार सचिव तरुण बजाज यांनी सांगितले की, याचा उल्लेख एक दिवसांपूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केला होता. लॉकडाउननंतर एकीकडे इतर क्षेत्रातही रिकव्हरी झाली आहे, परंतु लोकं अजूनही प्रवास आणि खाण्यापिण्याबाबत संभ्रमात आहेत. या नवीन पॅकेजमध्ये रोजगाराच्या (Employment) संधी निर्माण करण्यावरही भर देण्यात येईल, अशी अपेक्षा आहे. याशिवाय मायक्रो, स्मॉल आणि मीडियम एंटरप्रायजेस (MSME) वरही सरकार लक्ष केंद्रित करणार आहे.

आर्थिक व्यवहार सचिव तरुण बजाज म्हणाले की, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आम्हाला यावर काम करण्यास सांगितले आहे आणि आम्ही त्यावर प्रत्यक्षात काम करत आहोत. ते म्हणाले, विविध उद्योगांकडून आलेल्या सूचनांच्या आधारे आम्ही त्यावर काम करत आहोत. या कठीण काळात अर्थव्यवस्थेला चालना देणे फार महत्वाचे आहे. यापूर्वी सोमवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 15 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन.के. सिंह यांच्या आत्मचरित्राच्या आभासी प्रक्षेपणप्रसंगी सांगितले की, सरकार आणखी एक मदत पॅकेज आणण्याच्या तयारीत आहे.

मदत पॅकेजेसमध्ये काय विशेष असेल – स्त्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोणत्या क्षेत्रांना सर्वात जास्त पाठबळ हवे आहे त्यासाठीची आवश्यक माहिती गोळा केली जात आहे. फूड, ट्रॅव्हल आणि पर्यटन क्षेत्रांसाठी एक मोठा मदत पॅकेज जाहीर करता येईल, असा विश्वास आहे. कारण साथीचा फटका त्यांना सर्वाधिक बसलेला आहे.

यापूर्वी अर्थमंत्री निर्मला सीतारण यांनी दोन मदत पॅकेजेस जाहीर केलेली आहेत. त्यांचे मूल्य GDP च्या 1.5 टक्के आहे. पहिले पॅकेज मे 2020 मध्ये आत्मनिर्भर भारत योजनेअंतर्गत आणले गेले होते. तर दुसरे पॅकेज सरकारने आठवड्या भरापूर्वीच दिले आहे.

सरकारने 12 ऑक्टोबरला दुसरे मदत पॅकेज जाहीर केले. या पॅकेजमध्ये सरकारने केंद्रीय कर्मचार्‍यांना प्रोत्साहन देण्यासह अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. या पॅकेजची किंमत 46,675 कोटी रुपये आहे. सणासुदीच्या काळात अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी हे पॅकेज सरकारने दिले होते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.