सरकार महिलांच्या बँक खात्यात जमा करत आहे 2.20 लाख रुपये या बातमी मागील वास्तव जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र । केंद्र सरकार ‘प्रधानमंत्री नारी शक्ती योजने’अंतर्गत सर्व महिलांच्या बँक खात्यात 2 लाख 20 हजार रुपये जमा करीत असल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ यूट्यूब प्लॅटफॉर्मवर गेल्या काही दिवसात जोरदार व्हायरल होतो आहे. जर असा एखादा मेसेज तुमच्याकडे आला असेल तर तुम्ही सावधगिरी बाळगली पाहिजे. जेव्हा केंद्र सरकारचे अधिकृत ट्विटर हँडल PIB (प्रेस इन्फर्मेशन ब्यूरो) फॅक्ट चेकने या दाव्याचा आणि व्हायरल व्हिडिओचा तपास केला तेव्हा सत्य बाहेर आले. PIB ने सांगितले की हा व्हायरल मेसेज फेक आहे.

https://help.twitter.com/en/twitter-for-websites-ads-info-and-privacy

PIB फॅक्ट चेकमध्ये सत्य समोर आले – PIB फॅक्ट चेक अनेकदा ट्विटर हँडलद्वारे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या बनावट बातम्यांचे सत्य समोर आणते आणि सामान्य लोकांना जागरूक करते. त्याचप्रमाणे या व्हिडिओच्या तपासणी दरम्यान, केंद्र सरकारने अशी कोणतीही योजना सुरू केली नसल्याचे निष्पन्न झाले आहे.

PIB ने एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे- PIB याबाबत म्हणते की, जर तुम्हाला कोणताही व्हायरल मेसेज मिळाला आणि त्यातील एखाद्या लिंकवर क्लिक करण्यास सांगितले तर. तर पहिले त्या मेसेजची विश्वासार्हता तपासा, त्यावर त्वरित विश्वास ठेवू नका. PIB च्या मते, जर आपण चुकून एखाद्या बनावट मेसेजवर क्लिक केले तर ते आपल्यासह ऑनलाइन फ्रॉड होऊ शकतो.

PIB Fact Check म्हणजे काय ते समजून घ्या – PIB Fact Check केंद्र सरकारच्या पॉलिसी / योजना / विभाग / मंत्रालयांविषयीची चुकीची माहिती रोखण्यासाठी कार्य करते. सरकारशी संबंधित कोणतीही बातमी सत्य आहे की खोटी आहे हे जाणून घेण्यासाठी PIB Fact Check ची मदत घेतली जाऊ शकते. PIB Fact Check ला आक्षेपार्ह बातमीचा एक स्क्रीनशॉट, ट्विट, फेसबुक पोस्ट किंवा संशयास्पद बातम्यांचा URL वॉट्सऍप नंबर 918799711259 वर पाठवू शकता किंवा [email protected] वर मेल करू शकता.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.