तोट्यात असणाऱ्या कंपन्यांच्या जमिनी विकण्यासाठी सरकार आता आणणार नवीन कायदा ! या योजनेबद्दल जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । तोट्यात असणाऱ्या कंपन्या आणि बंद होणाऱ्या कंपन्यांची जमीन विकण्यासाठी सरकारने नवीन आराखडा तयार केला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या कंपन्यांकडे मोठ्या प्रमाणात जमीन आहे. तसेच, प्लांट व यंत्रसामग्रीची देखील विक्री करण्यासाठी सरकारने एक नवीन आराखडा तयार केला आहे. हे दोन भागात विभागले गेले आहे.

या योजनेच्या पहिल्या भागाअंतर्गत जमीन विकण्यासाठी सरकार Land Management Agency तयार करेल. सर्व एजन्सींची जमीन या एजन्सीपर्यंत पोहोचेल. यानंतर ही एजन्सी वेगवेगळ्या कंपन्यांना चांगल्या किंमतीला ही जमीन विकत देईल. ही जमीन देताना प्रॉयॉरिटी सेक्टरकडे अधिक लक्ष वेधले जाईल यासाठी विशेष काळजी घेतली जाईल. तसेच गृहनिर्माण क्षेत्रासाठीही तरतुदी केल्या जाऊ शकतात.

राज्य सरकारकडून भाडेतत्त्वावर घेतलेल्या जागेचीही Land Management Agency पूर्ण काळजी घेईल. ते परत केले पाहिजेत. तसेच ही एजन्सी जास्तीत जास्त उत्पन्न कसे कमवायचे ते देखील पाहिल. या योजनेच्या दुसर्‍या भागाखाली तोट्यात असणाऱ्या कंपन्या आणि बंद होणाऱ्या कंपन्यांच्या इमारती व मशीन्सची विक्री करण्यासाठी संपूर्ण योजना कालबद्ध पद्धतीने सादर केली गेली. गेल्या आठवड्यातच या सर्वांबाबत पंतप्रधान कार्यालयात (PMO) एक महत्त्वपूर्ण बैठक झाली. यानंतर हा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडे पाठविण्यात आला आहे.

कोणकोणत्या कंपन्यांची जमीनी विकल्या जाईल
सूत्रांच्या मते, त्यामध्ये डझनहून अधिक कंपन्या आहेत. एचओसीएल, स्कूटर्स इंडिया, बीपीसीएल (Bharat Pumps & Compressors Ltd)

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.