अन्याय होत असेल तर कोर्टात जा, गुलाबराव पाटलांचं एकनाथ खडसेंना प्रत्युत्तर

Eknath khadse and gulabrao patil
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव : हॅलो महाराष्ट्र – खोटा गुन्हा दाखल करून आपल्याला अटक करण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा धक्कादायक आरोप एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्याकडून करण्यात आला होता. त्यावर आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले ‘कोणताही गुन्हा हा खोटा दाखल होत नसतो. तसेच अन्याय होत असेल तर एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी कोर्टात जावं’, असा सल्लासुद्धा गुलाबराव पाटील यांनी खडसेंना (Eknath Khadse) दिला आहे.

काय म्हणाले गुलाबराव पाटील ?
एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केलेल्या आरोपावर प्रतिक्रिया देताना गुलाबराव पाटील म्हणाले, ‘कोणताही गुन्हा खोटा दाखल होत नसतो, पोलीस चौकशी करूनच गुन्हा दाखल करतात. जे होत आहे ते पाहावं. अन्याय होत असेल तर आपल्यासाठी कोर्ट आहे, या शब्दात मंत्री गुलाबराव पाटील यांनी एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांना प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले होते एकनाथ खडसे?
एकनाथ खडसे (Eknath Khadse) म्हणाले की, मला एका पोलिस अधिकाऱ्याचा फोन आला होता. त्याने सांगितलं की, पोलिस यंत्रणेच्या सहाय्याने तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल करून अटक करण्याचं षडयंत्र रचलं जात आहे. पोलिस अधिकाऱ्याने आपल्याला काही नावंही सांगितले. जामनेरच्या पोलिस अधिकाऱ्याच्या माध्यमातून हे षडयंत्र रचण्यात येत असल्याचा आरोप खडसे यांच्याकडून करण्यात आला होता.’

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती