बीड बायपास रुंदीकरण मोहिमेत ९ मालमत्तांवर हातोडा, मनपा अतिक्रमण विभागाची कारवाई

औरंगाबाद | बीड बायपास रस्ता रुंदीकरण मोहिमेअंतर्गत सोमवारी ९ मालमत्तांवर हातोडा चालविण्यात आला. मनपा अतिक्रमण विभागाच्या वतीने ही कारवाई करण्यात आली.
गेल्या काही वर्षांपासून बीड बायपास रस्ता मृत्यूचा सापळा बनला आहे. या रस्त्यावर अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमावला आहे. यामुळे रस्ता रुंदीकरण करण्यात यावे अशी जोरदार मागणी परिसरातील नागरिकांनी केली होती. सुमारे वर्षभरापूर्वी बऱ्याच मालमत्ता काढून रस्ता मोकळा करण्यात आला होता. परंतु अद्यापही अनेक मालमत्ता जैसे थे होत्या. यामुळे गेल्या आठवड्यात नगररचना विभागाच्या वतीने परिसरात मार्किंग करण्यात आली. यानंतर अतिक्रमण विभागाच्या वतीने या अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. सोमवारी या कारवाईत साजिदा नइम, पॅरीबेगम नबी पटेल, मुनाफ कच्ची आदी मालमत्ता धारकांच्या नऊ मालमत्ता जमीनदोस्त करण्यात आल्या. दोन दिवसात एकूण १६ मालमत्तांवर कारवाई करण्यात आली. ही कारवाई संजय कपाळे, सय्यद जमशेद, मजहर अली, पी.बी. गवळी, आर. एम सुरासे आदींनी केली.

चौकट
एका माजी पोलीस अधिकाऱ्याच्या हॉटेलचे अतिक्रमण काढले
यावेळी शिदोरी हॉटेलचे कंपाउंड देखील काढण्यात आले. ही हॉटेल एका माजी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची असल्याचे बोलले जाते. हे अतिक्रमण काढण्यात आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.

८० व्यापारी निघाले पॉझिटिव्ह, ७७५ जणांची करण्यात आली कोरोना चाचणी
औरंगाबादेत कोरोना संसगार्चा वाढता धोका लक्षात घेऊन कोविड चाचणी करून घेणाऱ्या व्यापारी व दुकानदारांची महानगरपालिकेच्या रुग्णालयात गर्दी होत असे. यामुळे मनपा प्रशासनाने आज सोमवार पासून सहा ठिकाणी तपासणी करण्यात आली. एकूण ७७५ व्यापाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात ८० व्यापारी पॉझिटिव्ह निघाले.

सध्या शहरात कोरोना संसर्ग वाढत आहे. या वाढत्या कोरोनाला रोखण्यासाठी महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. महानगरपालिकेच्या रुग्णालयात नागरिका बरोबर व्यापारी व दुकानदाराची गर्दी होत आहे . यामुळे संसर्ग अधिक वाढण्याची शक्यता आहे.
ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने आज सोमवार पासून विविध सहा ठिकाणी चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली.याला पहिल्या दिवशी चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पहायला मिळाले.

चौकट

केंद्रनिहाय चाचणी व पॉझिटिव्ह रुग्ण संख्या

प्री स्कुल – १२२ – १७(पॉझि), पैठण गेट – १०० – ११(पॉझि), जिजाई हॉस्पिटल – ९८ – ८(पॉझि)
अपना बाजार शहागंज, १०७ – ९ (पॉझि), अग्रसेन भवन, १७५ – १५ (पॉझि)
पाटीदार भवन, १७३ – २० (पॉझि)

सरकारी कार्यालयात २३ पॉझिटिव्ह
याशिवाय सरकारी कार्यालयात करण्यात आलेल्या चाचणीत सोमवारी तब्बल २३ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.

You might also like