हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । हरीयाणातील भाजपाच्या नेत्या सोनाली फोगट यांना बाजार समितीच्या एका अधिकाऱ्याला मारहाण केल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे. अटक केल्यानंतर पोलिसांनी सोनाली फोगट यांना हिसार न्यायालयात हजर केले. न्यायालयाने यावेळी त्यांची जामीनावर सुटका केली.
हरीयाणातील भाजपाच्या नेत्या सोनाली फोगाट यांना बुधवारी हिसार पोलिसांनी अटक केली. हिसारमधील बालासमंद येथील बाजार समितीच्या सचिवाला मारहाण केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आलेला होता. याप्रकरणी बाजार समितीचे सदस्य तसेच व्यापाऱ्यांनी काही दिवसांपासून फोगट यांच्या अटकेची मागणी केली होती. त्यामुळे बुधवारी पोलिसांनी सोनाली फोगाट यांना अटक केली. त्यानंतर त्यांना हिसार येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने यावेळी त्यांची जामीनावर सुटका केली.
५ जून रोजी हिसार जिल्ह्यातील बालसमंद येथे टिकटॉक स्टार आणि सध्या भाजपाच्या पदाधिकारी असलेल्या सोनाली फोगट यांनी बाजार समितीचे सचिव सुलतान सिंह यांना मारहाण केली होती. या मारहाणीचा व्हिडीओ सगळीकडे व्हायरल झाला होता. या व्हिडीओ मध्ये सोनाली फोगट यांनी त्या अधिकाऱ्याला आधी हाताने आणि नंतर चपलेनी मारहाण केली होती. बाजार समितीच्या सचिवांनी माझ्याविषयी अनुद्गार काढले, असा आरोप करत फोगट यांनी अधिकाऱ्याला मारहाण केली होती.
सोनाली फोगट या टिकटॉकवर खूपच प्रसिद्ध आहेत. त्या टिकटॉकवर नेहमीच व्हिडीओ पोस्ट करत असतात. राजकारणात प्रवेश केल्यानंतर गेल्या वर्षी झालेल्या निवडणुकीत सोनाली फोगाट यांनी २०१९ मध्ये काँग्रेसचे नेते कुलदीप बिश्नोई यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र या निवडणुकीत फोगाट यांना पराभव स्वीकारावा लागला होता.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.