हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बब्बर खालसा च्या वाधवा सिंह सहित ९ जणांना मंत्रालयाने आतंकवादी घोषित केले आहे. गृह मंत्रालयाकडून आज ही यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार पाकिस्तानच्या दहशतवादी संघटन शिख युथ फेडरेशनचे चिफ लखबर सिंहना देखील दहशतवादी यादीमध्ये घालण्यात आले आहे. या नऊ लोकांना बेकायदेशीर हालचाली अधिनियम(UAPA ऍक्ट, १९६७) अंतर्गत दहशतवादी घोषित करण्यात आले आहे.
मागच्या वर्षी सप्टेंबर मध्ये या कायद्यांतर्गत चार लोकांना दहशतवादी घोषित केले होते. ज्यामध्ये मौलाना मसूद अजहर, हाफिज सईद, जकी-उर-रहमान लखवी आणि दाऊद इब्राहिम यांचा समावेश होता. जाहीर केलेल्या यादीनुसार हे सर्व लोक सीमेपलीकडे परदेशी भूमीशी संबंधित दहशतवादी कारवाईंशी संबंधित आहेत. त्यांचा या दहशतवादी कारवाईंमध्ये सहभाग आहे. हे लोक देशात अस्थिरता निर्माण करणाऱ्या पंजाबमध्ये उग्रवाद वाढवू पाहणाऱ्या आणि खलिस्तान आंदोलनात सहभागी होते असे सांगण्यात आले आहे.
वाधवा सिंह बब्बर: पाकिस्तानच्या आतंकवादी संघटन ‘बब्बर खालसा इंटरनैशनल’ चा नेता, लखबीर सिंह: पाकिस्तान स्थित प्रमुख आतंकवादी संघटन ‘इंटरनेशनल शिख यूथ फेडरेशन’ चा चिफ रणजीत सिंह: पाकिस्तानच्या आतंकवादी संघटन ‘खालिस्तान जिंदाबाद फोर्स’ चा प्रमुख नेता, परमजीत सिंह: पाकिस्तानच्या आतंकवादी संघटन ‘खालिस्तान कमांडो फोर्स’ चा प्रमुख, भूपिंदर सिंह भिंडा: जर्मनी च्या आतंकवादीसंघटन ‘खालिस्तान जिंदाबाद फोर्स’ चा प्रमुख सदस्य, गुरमीत सिंह बग्गा: जर्मनी च्या आतंकवादीसंघटन ‘खालिस्तान जिंदाबाद फोर्स’ चा प्रमुख सदस्य, गुरपतवंत सिंह पन्नून: अमेरिकेतील बेकायदेशीर असोसिएशन ‘सिख फॉर जस्टिस’ चा प्रमुख सदस्य, हरदीप सिंह निज्जर: कॅनडा मधील ‘खालिस्तान टाइगर फोर्स’ चा प्रमुख, परमजीत सिंह: ब्रिटनमधील ‘बब्बर खालसा इंटरनैशनल’ चा चिफ अशी या यादीतील दहशतवाद्यांची नावे आहेत.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.