हनी ट्रॅप : फेसबुकवर मेसेज करुन तिने प्रसिद्ध उद्योजकाशी केली मैत्री, नंतर हाॅटेलवर बोलवून केले ‘असे’ काही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

सातारा, सांगली, कोल्हापूर, पुणे आणि बारामती या जिल्ह्यांमध्ये सध्या हनी ट्रॅप चे प्रकार समोर येऊ लागले आहे. प्रतिष्ठित व्यक्तींना सोशल मीडिया च्या माध्यमातून मेसेज किंवा फोन करायचे. त्यानंतर थोडे कॉन्टॅक्ट बनवून अश्लील मेसेज, व्हीडीओ पाठवायचे आणि त्या द्वारे ब्लॅक मेल करून त्या व्यक्ती कडून पैसे उकळायचे असे प्रकार सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. केवळ बदनामी होईल या भीतीने लोक या बाबत कोठेही वाच्यता करत नाहीत आणि या हनी ट्रॅप ला बळी पडत आहेत. तसेच गुन्हा दाखल करण्यासाठी टाळा टाळ केल्याने या गोन्हेगारांच्या टोळ्या सध्या मोकाट फिरत आहेत. सातारा तालुका पोलिसांनी अशाच एका टोळीच्या मुसक्या आवळल्या आहेत.

सातारा येथील एका व्यापाऱ्याला एक वर्षा पूर्वी अशाच एका हनी ट्रॅप मध्ये अडकवून त्या व्यक्ती कडून लाखो रुपये उकळन्यात आले होते. या व्यवसायिकाला एका महिलेने अश्लील मेसेज पाठवला होता. त्यानंतर ती महिला व्यवसायिका ची भेट घेण्यासाठी सातारा बस स्थानक परिसरात आली तेथून दोघे ही ठोसेघर या ठिकाणी गेले. तिथे एका हॉटेल मध्ये बसले असता अचानक त्या महिलेचे भाऊ म्हणून चार पाच युवक तिथे आले. त्यांनी व्यवसायिकला मारहाण केली व तुझे अश्लील व्हीडीओ आमच्या कडे आहेत त्यामुळे हे प्रकरण मिटवण्यासाठी पैसे दे असे धमकावून त्या कडून 6 लाख रुपयांची रक्कम, सोने चांदी आणि स्वतः ची आलिशान कार अशा सर्व वस्तू घेतल्या. या प्रकारानंतर घाबरलेल्या त्या व्यवसायिकाने कोठेही वाच्यता केली नाही. परंतु व्यवसायिकाची जी गाडी आरोपींनी घेतली होती ती बेवारस रित्या फलटण येथे आढळून आल्या नंतर या सगळ्या प्रकरणाचा उलगडा झाला.

या प्रकरणात सातारा तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेने आत्ता पर्यंत 3 जणांना अटक केली असून त्यात एका महिलेचा देखील समावेश आहे. दोन आरोपी पहिल्यांदा महिलेचा डीपी व्हाट्सएप ला ठेवून चॅटिंग करत असत. त्यानंतर महिलेला तोंडाला स्कार्प बांधून व्हीडीओ कॉल वर बोलण्यास सांगत असत. नंतर चॅटिंग मध्ये अश्लील फोटोंची देवाण घेवाण झाल्यावर पुढच्या व्यक्तीला धमकावून त्यांच्या कडून पैसे उकळत असत. या गोष्टींचा सध्या खोलवर तपास सातारा तालुका पोलीस करत असून या मध्ये आणखी किती गुन्हे या टोळक्याने केले आहेत या बाबत तपास सुरू आहे. तसेच अशा घटना जर कोणाच्या बाबत घडल्या असतील तर त्यांनी पुढे येऊन तक्रार द्यावी असे आवाहन देखील सातारा तालुका पोलीस निरीक्षक हंकारे यांनी केले आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.