हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मध्यप्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते कमलनाथ आज पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच भाजपामध्ये प्रवेश घेतलेल्या जोतिरादित्य सिंधिया यांच्यावर निशाणा साधला आहे. ते यावेळी, ‘मी कुणी महाराजा नाही, मी वाघ नाही, मी मामा नाही, मी कधीच चहा विकला नाही, मी कमलनाथ आहे. मध्यप्रदेशची जनता ठरवेल कोण मांजर आहे आणि कोण उंदीर आहे.’ म्हणाले.
माजी मुख्यमंत्री बडनावर मध्ये झालेल्या बूथ प्रभारी लोकांच्या बैठकीत उपस्थित राहिले होते. पक्षाच्या लोकांना धैर्य देत असताना त्यांनी कार्यकर्त्यांना राज्यात कोणता सौदा झाला आहे हे जनतेला दाखवून द्यायचे आहे असे सांगितले. ‘मी काँग्रेसचा शिपाई आहे, तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून उभा राहणार आहे.’ असे ते म्हणाले. बैठकीला उपस्थिती लावण्याआधी त्यांनी वैजनाथ महादेव मंदिरात दर्शन घेतले तसेच मध्यप्रदेश चे भविष्य चांगले राहू दे यासाठी प्रार्थना केल्याची माहिती समोर आली आहे.
I am not a ‘maharaja’. I am not a tiger. I am not ‘mama’. I never sold tea. I am Kamal Nath. Who is a tiger & who is not. The people of Madhya Pradesh will decide who is a cat & who is a rat: Former MP CM & Congress leader Kamal Nath addresses party worker in Badnawar, Dhar dist pic.twitter.com/ZeXVIJNxAg
— ANI (@ANI) July 7, 2020
दुसरीकडे राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी कमलनाथ यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘त्यांनी (कमलनाथ) मध्यप्रदेशची वाट लावली आहे.’ असे शिवराज यांनी म्हंटले आहे. त्यांनी केलेल्या कर्माचे परिणाम राज्य सहन करते आहे. आम्ही हे जनतेच्या समोर आणू असे ते म्हणाले.
He has destroyed entire Madhya Pradesh. The state is facing the result of whatever he had done. We will bring it before the people: Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chouhan https://t.co/Uxagro7GYF pic.twitter.com/MjPi3AcXzB
— ANI (@ANI) July 7, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.