३० जूनपर्यंत SBI ग्राहकांनी ‘हा’ पेपर जमा केला नाही तर FD चे पैसे मिळतील कमी, जाणुन घ्या कारण

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जर आपण बँकेत किंवा पोस्ट ऑफिसमध्ये एफडी केली असेल तर आपल्यासाठी ही बातमी वाचणे फार महत्वाचे आहे. कारण ज्यांनी एफडी केली आहे त्यांच्यासाठी 15G आणि 15H फॉर्म सबमिट करणे फार महत्वाचे आहे. 30 जूनपर्यंत आपण हे फॉर्म सबमिट न केल्यास आपल्या नफ्यावर (व्याजातून उत्पन्न) टीडीएस वजा केले जाईल. या फॉर्मशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या …

सध्या सुरु असलेला लॉकडाऊन पाहता CBDT ने फॉर्म 15G आणि फॉर्म 15H भरण्यासाठीची अंतिम तारीख ही 30 जून 2020 पर्यंत वाढविली होती. कर आकारणी टाळण्यासाठी, हे दोन्ही फॉर्म टॅक्सएशन पासून वाचण्यासाठी ते टॅक्स पेअर्स भरतात जे टॅक्सएशन मध्ये येत नाहीत.

प्रश्नः फॉर्म 15G आणि फॉर्म 15H सबमिट करणे का आवश्यक आहे?
उत्तरः जेव्हा आर्थिक वर्षात एफडीवरील व्याज उत्पन्नाची मर्यादा ओलांडली जाते, तेव्हा बँकांना टीडीएस कपात करण्याचे बंधन दिले जाते. म्हणूनच ठेवीदारास फॉर्म 15G आणि फॉर्म 15H (ज्येष्ठ नागरिकांसाठी) स्व घोषणापत्र द्यावे लागेल की त्यांचे उत्पन्न हे करपात्र मर्यादेपेक्षा कमी आहे. फॉर्म 15G आणि फॉर्म 15H जमा करून आपण व्याज किंवा भाडे यासारख्या उत्पन्नावरील टीडीएस टाळू शकता. हे फॉर्म बँका, कॉर्पोरेट बॉन्ड जारी करणार्‍या कंपन्या, पोस्ट ऑफिस किंवा भाडेकरू इत्यादींना द्यावे लागतील.

फॉर्म 15G चा वापर 60 वर्षे वयाखालील भारतीय नागरिक, हिंदू अविभाजित कुटुंब म्हणजे HUF आणि ट्रस्ट करू शकतात. त्याचप्रमाणे फॉर्म 15H हा 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या भारतीय नागरिकांसाठी आहे. फॉर्म 15G आणि फॉर्म 15H केवळ एक वर्षासाठी व्हॅलिड आहेत. त्यांना दरवर्षी जमा करणे आवश्यक आहे.

प्रश्नः जर बँकेने टॅक्स कट केला तर पैसे परत कसे मिळवायचे?
उत्तरः फॉर्म 15G आणि फॉर्म 15H सबमिट करण्यास विलंब झाल्यामुळे वजा केल्या जाणाऱ्या अतिरिक्त टीडीएसचा रिफंड फक्त इनकम टॅक्स रिफंड फाइल करून घेतला जाऊ शकतो.

प्रश्नः ते कसे जमा करता येईल?
उत्तरः ग्राहक ‘ई-सेवा’,’15G / H’ हा पर्याय निवडा.

>> आता फॉर्म 15G किंवा फॉर्म 15H निवडा
>> त्यानंतर Customer Information File (CIF) No वर क्लिक करा आणि सबमिट करा.
>> सबमिट बटणावर क्लिक केल्यानंतर ते तुम्हाला एका पेजवर घेऊन जाईल ज्यात काही आधीच-भरलेली माहिती असेल. मग इतर माहिती भरा.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.