४८ दिवसात शेतकऱ्यांनी पैसे जमा नाही केले तर ४% च्या जागी ७% द्यावे लागेल व्याज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील ७ करोड पेक्षा अधिक शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची माहिती आहे. जर ४८ दिवसात शेतकऱ्यांनी केसीसी वर घेतलेले कर्ज परत केले नाही तर त्यांना ४%च्या जागी ७% व्याज द्यावे लागणार आहे. शेतीच्या कर्जावर सरकारने ३१ ऑगस्ट पर्यंत पैसे जमा करण्याची मुदत दिली आहे. या मुदतीच्या आत पैसे जमा केल्यास शेतकऱ्यांना ४% व्याज बसेल अन्यथा ७% व्याज भरावे लागेल. सामान्य परिस्थितीत हे कर्ज ३१ मार्च पर्यंत परत करायचे असते. त्यानंतर शेतकऱ्यांना पुढच्या वर्षीसाठी पैसे दिले जातात. जे शेतकरी समजदार आहेत ते वेळेवर पैसे जमा करून व्याजात सूट मिळवितात. दोन चार दिवसानंतर परत पैसे काढून घेतात. ज्यामुळे बँकेतही चांगले रेकॉर्ड राहते आणि शेतीसाठी कधीच पैशाची कमी पडत नाही.

मोदी सरकार ने संचारबंदी पाहता ३१ मार्च ची मुदत वाढवून पूर्वी ३१ मे पर्यंत वाढविली होती. नंतर मुदत आणखी वाढवून ३१ ऑगस्ट पर्यंत केली गेली आहे. याचा अर्थ असा आहे की केसीसी कार्ड च्या कर्जावर ४% व्याजाने ते ३१ ऑगस्ट पूर्वी पूर्ण परत करू शकतात. नंतर ते ३% महाग पडेल. शेतीसाठी केसीसी वर घेतल्या जाणाऱ्या तीन लाख रुपयांच्या कर्जावर ९% व्याज असते. मात्र २% ची सबसिडी सरकार देते. याप्रकारे हे व्याज ७% पडते. पण वेळेवर परत केल्यास यातही ३% सूट मिळते. अशाप्रकारे जागरूक शेतकऱ्यांसाठी व्याज केवळ ४% राहते.

उत्तरप्रदेशच्या अमरोहा जिल्ह्यातील प्रथमा बँकेचे मॅनेजर अंकुर त्यागी यांनी सांगितले, १ हेक्टर जमिनीवर २ लाख रुपयांचे कर्ज मिळू शकते. प्रत्येक बँकेची कर्जमर्यादा वेगवेगळी असते. यासाठी बँक किसान क्रेडिट कार्ड जारी करते. ज्याद्वारे आपण केव्हाही पैसे काढू शकता. कोणत्याही को ऑपरेटिव्ह तसेच क्षेत्रीय ग्रामीण बँकेतून हे कर्ज मिळविता येते. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया, रुपे केसीसी जारी करते. एसबीआय, बीओआय आणि आयडीबीआय बँकेतूनही हे कार्ड काढले जाऊ शकते.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.