महत्वाची सूचना ! आज आणि उद्या SBI च्या ‘या’ सर्व्हिस बंद राहतील, ट्विट करून बँकेने दिली माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) आपल्या खातेदारांसाठी महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. बँकेने ट्वीट करून आपल्या ग्राहकांना सतर्क केले आहे आणि बँकिंग संबंधित आपली कामे त्यांच्या गरजेनुसार आधीच उरकण्याचे आवाहन केले आहे. आज आणि उद्या बँकेच्या काही महत्त्वाच्या सर्व्हिस बंद ठेवल्या जातील असे सांगत बँकेने आपल्या ग्राहकांसाठी ही महत्त्वपूर्ण माहिती जारी केली आहे.

खरं तर SBI ने ट्विटरवर म्हटलं आहे की, सिस्टीम मेंटेनन्समुळे बँकेच्या काही सर्व्हिस 16 आणि 17 जुलै रोजी बंद राहतील. या सर्व्हिसमध्ये इंटरनेट बँकिंग,Yono, Yono Lite आणि UPI सर्व्हिस समाविष्ट असेल. SBI ने ट्वीटद्वारे म्हटले गेले आहे की,” 16 आणि 17 जुलै रोजी रात्री 10:45 ते दुपारी 1.15 (150 मिनिट) पर्यंत या सर्व्हिस उपलब्ध नसतील.”

https://twitter.com/TheOfficialSBI/status/1415587513603813377?

SBI ने दिलेल्या माहितीनुसार, बँक आज आपले UPI प्लॅटफॉर्म अपग्रेड करेल, जेणेकरुन ग्राहकांचा अनुभव सुधारू शकेल. या दरम्यान, UPI ट्रान्सझॅक्शन ग्राहकांसाठी बंद असतील.

यापूर्वीही या सर्व्हिस बंद केल्या गेल्या
SBI ने पहिल्यांदाच कोणतीही सर्व्हिस बंद केलेली नाही. याआधीही बँकेने 3 जुलै रोजी रात्री 3: 25 ते 4 जुलै रोजी पहाटे 5.50 पर्यंत या सर्व्हिस बंद केल्या होत्या.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment